Soybean-Cotton Rate updates Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean-Cotton Rate: सोयाबीन-कापसाच्या धोरणात्मक निर्णयासाठी उपमुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या पत्रात राज्यातील सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कापूस व सूत नियार्तीला प्रोत्साहन द्यावे, सोयापेंड (डीओसी) नियार्तीला प्रोत्साहन द्यावे, सोयापेंड आयात करु नये,

Team Agrowon

सोयाबीन-कापूस (Soybean-Cotton Rate) उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांना पत्र पाठवले.

सोयाबीन-कापसाला योग्य दर मिळावा, यासाठी केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे, असल्याचेही फडणवीस यांनी पत्रात म्हंटले आहे.

राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला प्रति क्विंटल ५८०० तर कापसाला प्रति क्विंटल ८२०० रुपये उत्पादन खर्च लागतो. परंतु सध्या खाजगी बाजारात सरासरी सोयाबीनला प्रति क्विंटल ५६०० रुपये आणि कापसाला प्रति क्विंटल ९००० रु. दर मिळत आहे.

मात्र खाजगी बाजारात मिळणारा दर केवळ उत्पादन खर्चाची बरोबरी करतो, असे मुद्दे फडणवीस या पत्राद्वारे मांडले आहेत.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या पत्रात राज्यातील सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कापूस व सूत नियार्तीला प्रोत्साहन द्यावे, सोयापेंड (डीओसी) नियार्तीला प्रोत्साहन द्यावे, सोयापेंड आयात करु नये, यंदा १५ लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करावी,

खाद्य तेलांवरील आयात शुल्क ३० टक्के करावे, कापसाचे आयात शुल्क सध्या ११ टक्के आहे ते तसेच कायम ठेवावे, जी.एम. सोयाबीनच्या लागवडीला परवानगी द्यावी, सोयाीबनवरील पाच टक्के जीएसटी रद्द करावा व पिककर्जासाठी सिबीलची अट रद्द करावी, मागण्या केल्या आहेत.

दरम्यान, ९ जानेवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मुंबईमध्ये यासंदर्भात फडणवीस यांची भेट घेतली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू, शेतकऱ्यांना मदत, सवलती मिळणार- कृषिमंत्री भरणे

Sindhudurg Eco Sensitive Zone: पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात सिंधुदुर्गातील १९८ गावांचा समावेश

Water Management: धरणनिहाय पाणीसाठ्याचे नियोजन करावे : जिल्हाधिकारी

Karnataka Drought Relief: कर्नाटकातील ५० लाख दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, प्रत्येकी २,५०० रुपयांचे कृषी निविष्ठा अनुदान जाहीर

Rabi Season: यंदाच्या रब्बी हंगामासाठी महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT