Ajit Pawar agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar : ‘संपूर्ण वन’ उपक्रमाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

Maharashtra Government : पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र परिसरात जनसहयोग या संस्थेच्या उपक्रमातून ‘संपूर्ण वन’ही वनवाटीका विकसित करण्यात आली आहे. या ठिकाणी उपमुख्यमंत्री पवार यांनी भेट दिली.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा : शहरातील पडेगाव येथे जनसहयोग या संस्थेने विकसित केलेल्या ‘संपूर्ण वन’ उपक्रमास रविवारी (ता. ४) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. वृक्ष लागवड, संवर्धन करुन जनसहयोग संस्था करीत असलेल्या पर्यावरण संवर्धन कार्याचे श्री. पवार यांनी कौतुक केले.

उपमुख्यमंत्री पवार हे रविवारी शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी पडेगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र परिसरात जनसहयोग या संस्थेच्या उपक्रमातून ‘संपूर्ण वन’ही वनवाटीका विकसित करण्यात आली आहे. या ठिकाणी उपमुख्यमंत्री पवार यांनी भेट दिली. विधान परिषदेचे आ.सतिष चव्हाण, आ. विक्रम काळे त्याचे समवेत होते. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गिरे यांनी उपक्रमाची माहिती दिली.

या प्रक्षेत्रावर २२ हजार वृक्ष लागवड करण्यात आली असून त्यात ४०० प्रजातीचे वृक्ष, वनस्पतीचा समावेश आहे. या उद्यानामुळे परिसरातील जैवविविधता विकासाला चालना मिळाली आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. वृक्ष लागवड, वृक्ष देखभाल कामे करणाऱ्या कामगारांशी श्री. पवार यांनी चर्चा केली. याठिकाणी साकारलेल्या भारत उद्यान, नक्षत्र उद्यान, बांबू उद्यान अशा विविध उद्यानांना भेट देऊन श्री. पवार यांनी पाहणी केली.

लागवड झालेल्या वृक्ष प्रजातींची माहितीही त्यांनी करुन घेतली. विविध प्रजातीच्या वनस्पती, फुले, वेली आदी एकाच क्षेत्रात असल्याने याठिकाणी संशोधन केंद्र स्थापन करावे, मागणी ही संस्थेच्या वतीने करण्यात आली. संस्थेचे संदीप जगधने, नंदन जाधव, मिलिंद गिरधारी आदी यावेळी उपस्थित होते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT