Muktai Palkhi Agrowon
ॲग्रो विशेष

मुक्ताई पालखीचे आज श्रीक्षेत्र मेहूण येथून प्रस्थान

आदिशक्ती संत मुक्ताईच्या पालखीचे मंगळवारी (ता. ३१) श्रीक्षेत्र मेहूण तापीतिर येथून प्रस्थान होणार आहे.

टीम ॲग्रोवन

चांगदेव, जि. जळगाव : आदिशक्ती संत मुक्ताईच्या पालखीचे मंगळवारी (ता. ३१) श्रीक्षेत्र मेहूण तापीतिर येथून प्रस्थान होणार आहे. पंढरपूरात पोचण्यासाठी सर्वात जास्त दिवस लागणारा हा पालखी सोहळा ठरला आहे.

पंढरपूर आषाढी वारीसाठी मुक्ताई पालखीचे प्रस्थान श्रीक्षेत्र मेहूण येथून होते. वर्षानुवर्षे परंपरागत असलेल्या या पालखी सोहळा ३१ मेला दुपारी तीन वाजता संत मुक्ताई मंदिरात आदिशक्ती मुक्ताईच्या पादुका पूजन करून होईल. या पालखीची धुरा हरिभक्त पारायण सुधारक महाराज मेहूणकर वाहत आहे.

यात पहिला मुक्काम चिंचोलनंतर वरणगाव, सुरवाडा, मुंदखेड, जामनेर पुरा, पहूर, चांदईमळा, जालना यासारख्या ३६ दिवसांचा पायी प्रवास करुन ३७ व्या दिवशी ७ जुलैला पंढरपूर येथे मुक्ताई पालखी पोचेल. पंढरपूर येथे वरणगाव येथील चंद्रकांत हरी बढे यांचा खानदेश भक्तनिवास, सांगोला रोड, पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या वारीपर्यंत मुक्काम असणार आहे. ज्या भाविकांना मुक्ताई पालखी सोहळ्यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी श्री आदिशक्ती मुक्ताई देवस्थान श्रीक्षेत्र मेहूण तापीतिर व पालखी चालक हरिभक्त परायण सुधारक महाराज मेहूणकर आणि संस्थानचे अध्यक्ष हरिभक्त पारायण रामराव महाराज मेहूणकर यांच्याशी संपर्क करावा, असे मुक्ताई संस्थान, मेहूण तापीतिरकडून कळविण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT