Mosmbi Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Mosambi : कृषिकन्यांकडून मोसंबी बाग आराखड्याचे प्रात्यक्षिक

कृषिकन्यांनी शेतकऱ्यांना मोसंबी फळबाग नियोजन, आराखडा आणि व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.

टीम ॲग्रोवन

हडस पिंपळगांव (जि.औरंगाबाद) ः येथे दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय (Dadasaheb Patil Agriculture College) दहेगाव (ता. वैजापूर) येथील कृषिकन्यांनी शेतकऱ्यांना मोसंबी फळबाग नियोजन (Mosmbi Orchard Mangement), आराखडा आणि व्यवस्थापन (Mosmbi Management) याबाबत मार्गदर्शन केले. या वेळी फळबागेचा आराखडा तयार करून प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली.

प्रात्यक्षिकाचे आयोजन गावातील शेतकरी भागीनाथ निघोठे यांच्या शेतामध्ये करण्यात आले. या वेळी दोन झाडांत ५ मीटर आणि दोन ओळींत ५ मीटर अंतर ठेवून खड्डे काढण्यात आले. या चौकोनी पद्धतीने दीड एकर लागवड क्षेत्रात सुमारे २३० खड्डे बसतात. तसेच बागेत आंतरपिकांची लागवड, मशागतीची कामे आणि सिंचन व्यवस्थापन करणे सोयीचे होते, असे कृषिकन्यांनी सांगितले.

यावेळी कृषिकन्या अश्‍विनी शिंदे, शोजना शेख, मयूरी उगले, आश्‍विनी पंडित, मोनिका तलारी, अनुष्का ताटीकुंडलवार, कल्याणी वाघमारे आदींनी उपस्थित शेतकऱ्यांना विविध शेती विषयांवर माहिती दिली. यासाठी प्राचार्य डॉ. एस. एस. बैनाडे, डॉ. बी. एम. जोशी, प्रा. ए. आर. पगार, प्रा. ए. एस. गजभिये, प्रा. के. ए. भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT