Drought Condition agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : सातारा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Maharashtra Drought : अपुरा पाऊस, घटलेले शेती उत्पादन व वाढलेल्या महागाईमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सावरण्यासाठी जिल्ह्यात संपूर्ण दुष्काळ जाहीर करावा.

Team Agrowon

Satara News : अपुरा पाऊस, घटलेले शेती उत्पादन व वाढलेल्या महागाईमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सावरण्यासाठी जिल्ह्यात संपूर्ण दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करत शिवसेनेच्या ठाकरे गटाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिवसेना उपनेते, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, शिवसेना उपनेत्या छायाताई शिंदे व जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मोर्चास सुरुवात झाली. जिल्हाप्रमुख हर्षल कदम, संजय भोसले, रामदास कांबळे, बाळासाहेब शिंदे, माऊली पिसाळ, हणमंतराव चवरे, साहेबराव शिंदे, सुधीर राऊत आदी उपस्थित होते.

प्रा. बानुगडे-पाटील म्हणाले, ‘‘संपूर्ण महाराष्ट्रातच अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यातूनही निसर्ग शेतकऱ्यांच्या मदतीला काहीअंशी धावून आला; पण सरकार मात्र, शेतकऱ्यांसाठी धान येताना दिसत नाही. राज्यातील सरकारने केवळ ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे.

संपूर्ण राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. दररोज राज्यातील दहा ते १२ शेतकरी आत्महत्या करत आहेत. उत्पादन घटलेले असतानाही शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल, असे वाटत होते; पण सोयाबीनचे दरही पडलेले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सोयाबीनला क्विंटलला अकरा हजार रुपये भाव होता.

आता अपेक्षित भाव नाही. साखर कारखाने उसाअभावी कमी कालावधीत चालणार आहेत. त्यामुळे साखरेचे दर वाढणार आहेत; पण त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. त्यामुळे या वर्षी उसाला टनाला चार हजार दर द्यावा, केवळ चाळीस तालुक्यांपुरता नव्हे सरसकट दुष्काळ जाहीर करावा. वाई, खंडाळ्यात दुष्काळ जाहीर झाला; पण माण, खटाव, कोरेगाव, कऱ्हाडची स्थिती गंभीर आहे, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे सरसकट जिल्हा दुष्काळ जाहीर करा.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT