Rajma  Agrowon
ॲग्रो विशेष

Rajma : पीकविमा योजनेत घेवड्याचा समावेश करण्याची मागणी

Crop Insurance Scheme : तालुक्याचे नाव दिल्ली बाजारपेठेत पोहोचविलेल्या वाघा घेवड्याचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देऊर (ता. कोरेगाव) येथील महालक्ष्मी महिला शेतकरी गटाच्या नेतृत्वाखाली तळिये, पिंपोडे बुद्रुक, परतवडी येथील शेतकरी आणि महिलांनी येथील तहसीलदार, तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Team Agrowon

Wagha Ghevada : तालुक्याचे नाव दिल्ली बाजारपेठेत पोहोचविलेल्या वाघा घेवड्याचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देऊर (ता. कोरेगाव) येथील महालक्ष्मी महिला शेतकरी गटाच्या नेतृत्वाखाली तळिये, पिंपोडे बुद्रुक, परतवडी येथील शेतकरी आणि महिलांनी येथील तहसीलदार, तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. महालक्ष्मी शेतकरी गटाच्या अध्यक्ष व देऊर ग्रामपंचायतीच्या सदस्या कविता केशव देशमुख यांनी शेतकरी आणि महिलांसह तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव यांना निवेदन दिले.

त्यात म्हटले आहे, की तालुक्यातील वाघा घेवडा हा उत्तर भारतात ‘राजमा’ म्हणून प्रसिद्ध आहे. एकेकाळी दिल्ली मार्केटमध्ये कोरेगावच्या घेवड्याला मोठी मागणी होती. दिल्लीतील मार्केटचा घेवड्याचा भावही त्या वेळी कोरेगावातून निश्चित होत.

इतक्या मोठ्या प्रमाणात घेवड्याचे उत्पादन कोरेगावसह लगतच्या अन्य तालुक्यांत निघत. मात्र, मागील काही वर्षांत हवामानात झालेल्या बदलामुळे घेवड्याचे उत्पादन घटले आहे. भाव तेजीत नव्हे, तर उच्चांकी निघत आहेत. मात्र, दुष्काळ व अतिवृष्टीत घेवड्याचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळत नाही.

परिणामी, शेतकरी अडचणीत येत आहे. कारण प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील कडधान्य वर्गीय पिकांत वाघा घेवड्याचा समावेश नाही. त्यामुळे पीकविमा उतरवता येत नाही व भरपाईही मिळत नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक गर्तेत सापडतो. हल्ली खरीप, रब्बी हंगामातही घेवड्याचे उत्पादन घेतले जात आहे.

मात्र, दुष्काळ, अतिवृष्टीत नुकसान झाल्यास नुकसान भरपाईचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा राहतो. तेव्हा, घेवड्याचा समावेश कडधान्य वर्गीय पिकांत करावा, म्हणजे त्याला प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून भरपाई मिळणे शक्य होईल. त्यासाठी तहसीलदार, तालुका शेती अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा, अशी आग्रही मागणी आहे.

प्रसंगी आंदोलनही करू. दरम्यान, घेवड्याचा समावेश कडधान्यवर्गीय पिकांत करावा, म्हणजे दुर्दैवाने नुकसान झाल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेता येईल. ही आपली मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोचवून पाठपुरावा करण्याची ग्वाही तालुका कृषी अधिकारी श्री. जाधव यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: कृषिपंपाचे वीज कनेक्शन तोडल्याने शेतकरी संतप्त, 'महावितरण'च्या अधिकाऱ्यांना विचारला जाब

Hailstorm Damage: गारपीट-अवकाळीमध्ये ऊस पिकाची काळजी कशी घ्यावी?

District Collector Award: ई-गव्हर्नन्सबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव

Unseasonal Rain: 'अवकाळी'सह गारपिटीचा तडाखा सुरुच, पुण्यासह उत्तर महाराष्ट्राला झोडपले, कांदा, गहू पिकाचे नुकसान, शेतकरी चिंतेत

Sangli District Bank: सांगली जिल्हा बँक राज्यात अग्रेसर बनविणार

SCROLL FOR NEXT