MGNREGA  Agrowon
ॲग्रो विशेष

Labour Wages : रोहयोतील मजुरांचे वेतन तातडीने देण्याची मागणी

Employment Guarantee : चालू वर्षी प्रत्येक तालुका पंचायत समितीच्या माध्यमातून शासनाच्या कोट्यातून रोजंदारीवर अनेक कामे मंजूर केली जात आहेत.

Team Agrowon

Pune News : प्रत्येक तालुका पंचायत समितीच्या माध्यमातून रोजंदारीवर गोठा, सिंचन विहीर, कुक्कुटपालन यांसह अनेक कामे मंजूर केली जात आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या राज्यभरातील कुशल कामे, अर्धकुशल व अकुशल मजुरांचे वेतन तत्काळ मजुरांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी शिवसेनेचे शिरूर तालुकाप्रमुख गणेश जामदार यांनी केली आहे.

चालू वर्षी प्रत्येक तालुका पंचायत समितीच्या माध्यमातून शासनाच्या कोट्यातून रोजंदारीवर अनेक कामे मंजूर केली जात आहेत. ही कामे पूर्णत्वास जाऊन देखील खात्यांवर मजुरीचे पैसे जमा न झाल्याने मजुरांच्या पदरी निराशा पडली आहे. शासकीय योजनांच्या माध्यमातून अनेक शेतकरी जॉबकार्ड काढून राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरीवर आपली कामे करून घेत आहेत.

मात्र, वेळेत निधी न आल्याने ही कामे करताना सर्वसामान्य शेतकऱ्यांना स्वखर्चाने करून घ्यावी लागत असल्याने व रोजगार हमीचे पैसे वेळेत जमा होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार हमी हाच एकमेव आधार असल्याने योजनेअंतर्गत चालू असलेल्या कामांच्या मजुरांचे प्रत्येक आठवड्याला मजुरीचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करणे गरजेचे आहे. मात्र, मजुरी वेळेत मिळत नसल्याने रोजगार हमीसारख्या कामांमध्ये मजुरांची संख्या दिवसेंदिवस कमी झाली आहे.

शासन स्तरावरून चौकशी होणे गरजेचे

रोजगार हमीच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या कामांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. योजनेतून देण्यात येणाऱ्या सिंचन विहिरीची कामे मजुरांच्या साह्याने होतात का, गोठ्यासाठी वितरित करण्यात येणाऱ्या निधीतून बांधकाम करण्यात आले आहेत की जुनेच गोठे दाखवून निधीचा अपहार होत आहे, याबाबत शासनस्तरावर चौकशी होणे गरजेचे आहे. योजनांचा लाभ घेण्यासाठी एजंट लोकांच्या माध्यमातून पैसे लाटत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

रोजगार हमीच्या कामांच्या मजुरीसंदर्भात शिरूरचे गटविकास अधिकारी महेश डोके यांच्याशी चर्चा केली असता कामांचे योग्य प्रस्ताव आम्ही तयार केले आहेत. या संदर्भातील योग्यप्रकारे आमचे काम आम्ही पूर्ण केले आहे. शासनाकडून पैसे जमा झाल्यास शेतमजुरांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येतील, असे सांगण्यात आले.
-गणेश जामदार, तालुकाप्रमुख, शिवसेना, शिरूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT