Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : दैठणा मंडलातील शेतकऱ्यांना पीकविमा देण्याची मागणी

पावसाची चुकीच्या आकडेवारीमुळे या मंडलातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान तसेच पीकविम्याच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.

Team Agrowon

Crop Insurance News : परभणी जिल्ह्यातील दैठणा (ता. परभणी) मंडलातील पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान आणि पीकविमा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हाधिकारी तथा पीकविमा जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षा आंचल गोयल यांच्याकडे करण्यात आली.

दैठणा मंडलातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजना (Prime Minister Crop Insurance Scheme) अंतर्गंत २०२२-२३ च्या खरीप हंगामातील पीकविमा आणि २०२२- २३ ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीबद्दल अनुदान मिळायला पाहिजे होते.

या मंडलात झालेल्या पावसाची चुकीच्या आकडेवारीमुळे या मंडलातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान तसेच पीकविम्याच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.

मागील दोन महिन्यांपूर्वी काही शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाला अत्यल्प स्वरूपात अनुदान प्राप्त झाले होते. परंतु ती रक्कम तुटपुंजी होती. झालेले नुकसान हे त्यापेक्षा अधिक आहे.

त्यामुळे दैठणा मंडळातील बसवलेले पर्जन्यमापक सदोष असल्यामुळे त्याचा पंचनामा करून सिंगणापूर आणि जांब मंडळाच्या आधारे दैठणा मंडळातील शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान व पीकविमा देण्यात अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, जिल्हा उपाध्यक्ष माधव चव्हाण, किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तराव कच्छवे, केशव कच्छवे आदींनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Crisis : दुष्काळी संकट तंत्रज्ञानाच्या पलीकडे; दीर्घकालीन नियोजनाची गरज; कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

SCROLL FOR NEXT