Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Parner Sugar Factory : पारनेर कारखानाप्रकरणी आरोपींच्या अटकेची मागणी तीव्र

Sugar Industry : पारनेर तालुक्याची कामधेनू असलेल्या सुमारे १७ हजार सभासदांच्या मालकीच्या सहकारी साखर कारखान्याचे भ्रष्ट मार्गाने खासगीकरण केलेल्या प्रकरणासंबंधित हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : पारनेर साखर कारखाना विक्री गैरव्यवहारप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपींना तातडीने अटक करावी. तसेच गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करावी, अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक व अप्पर पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात कारखाना बचाव व पुनरुज्जीवन समितीच्या वतीने करण्यात आली आहे, अशी माहिती समाजीक कार्यकर्ते व या प्रकरणातील फिर्यादी अॅड. रामदास घावटे यांनी दिली.

अॅड. रामदास घावटे यांनी सांगितले, की पारनेर साखर कारखाना विक्री गैरव्यवहारप्रकरणी पारनेर न्यायालयाच्या आदेशाने राज्य सहकारी बँकेचे दोन वरिष्ठ अधिकारी, माजी खासदार विदुरा नवले यांची मुले ज्ञानेश व शिवराज नवले यांच्यासह क्रांती शुगर लिमिटेड कंपनीच्या संचालकांवर ८ जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल होऊन पाच दिवस झाले तरी तपासी अधिकारी, पारनेरचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी अद्याप तपास सुरू केला नाही अथवा फिर्यादीकडे कागदपत्रांची मागणी केली नाही, असा आरोप बचाव पुनरुज्जीवन समितीच्या वतीने करण्यात आला.

पारनेर तालुक्याची कामधेनू असलेल्या सुमारे १७ हजार सभासदांच्या मालकीच्या सहकारी साखर कारखान्याचे भ्रष्ट मार्गाने खासगीकरण केलेल्या प्रकरणासंबंधित हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारखाना विक्री गैरव्यवहार हा तब्बल ३०० ते ४०० कोटींचा आहे.

याबाबतचा सर्व कागदोपत्री पुरावा कारखाना बचाव व पुनरुज्जीवन समितीकडे आहे. या आर्थिक व्यवहाराच्या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटीची नेमणूक करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

गुन्ह्यातील आरोपींना २६ जानेवारीपर्यंत अटक न झाल्यास २७ पासून पारनेर पोलिस ठाण्यासमोर कारखाना सभासदांसह उपोषण करण्याचा इशारा कारखाना बचाव व पुनरुज्जीवन समितीने दिला. फिर्यादी या नात्याने गुन्ह्याशी संबंधित माहिती तपास अधिकारी बारवकर यांना देण्याचा प्रयत्न केला असता ते दुर्लक्ष करतात. त्यामुळे आम्ही अटकेची मागणी केली, असे ॲड. घावटे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरला तिसऱ्या टप्प्यात ८८ कोटी ८१ लाखांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT