Agriculture Input Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Inputs : कीड नियंत्रणासाठी कृषी निविष्ठांची मागणी

Crop Pest Management : खानदेशात मका, हरभरा पिकांत अळीचा प्रकोप वाढत आहे. मका पिकात अमेरिकन लष्करी अळी दिसत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मका, हरभरा पिकांत अळीचा प्रकोप वाढत आहे. मका पिकात अमेरिकन लष्करी अळी दिसत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी योग्य मार्गदर्शन व कृषी निविष्ठा किंवा कीडनाशके उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

मध्यंतरी जळगाव लोकसभा क्षेत्राचे खासदार उन्मेष पाटील यांनीदेखील या समस्येबाबत जिल्हा प्रशासन, शासनाकडे मागणी केली होती. सतत ढगाळ वातावरण असते. दुसरीकडे विषम वातावरणामुळे पिकांवर किडींचा प्रकोप होत आहे. हरभरा पिकात घाटे अळी आहे. तर मका पिकात अमेरिकन लष्करी अळी आहे.

खानदेशात सुमारे ४५ हजार हेक्टरवर मका पीक आहे. तर सुमारे दीड लाख हेक्टरवर हरभरा पीक आहे. एक महिना किंवा २० दिवसांच्या मका पिकातही लष्करी अळीचा प्रकोप आहे.

ही अळी पोंग्यात सक्रिय असून, यामुळे पिकाची वाढ खुंटली आहे. हरभऱ्यालाही घाटे लगडत आहेत. पण घाट्यांचे नुकसान अळ्या करीत आहेत. यामुळे शेतकरी संकटात आहेत. कीडनाशके खरेदी करून त्याची फवारणी घेत आहेत. फवारणी न केल्यास पीक पुरते हातचे जात आहे.

फवारणी न घेतल्यास मका पिकाचा तर चाराही हाती येणार नाही, अशी स्थिती आहे. मका पीक जोमात येण्यासाठी खतांबरोबरच कीडनाशके, संप्रेरके घ्यावी लागत आहेत. यात उत्पादन खर्च किमान २० टक्के वाढला आहे.

मका पिकाला फवारणीसंबंधी कीडनाशकांचा एकरी किमान तीन हजार रुपये खर्च येत आहे. खर्च अधिक, पण दर कमी, अशी स्थिती आहे. यामुळे कीडनाशके व आवश्यक निविष्ठा कृषी विभाग, शासनाने अनुदानावर उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT