Talathi Office Agrowon
ॲग्रो विशेष

Talathi Office : मोहोळमध्ये २९ नवीन तलाठी कार्यालयांची मागणी

Latest Marathi News : मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी विविध गावचे रस्ते, समाज मंदिरे व अन्य विकास कामावर मोहोळ विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे.

Team Agrowon

Solapur News : मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी विविध गावचे रस्ते, समाज मंदिरे व अन्य विकास कामावर मोहोळ विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे. त्यांनी आता महसूल विभागाकडे लक्ष केंद्रित केले असून, तालुक्यातील १९ व मतदार संघातील इतर गावासाठी १० ठिकाणी तलाठी कार्यालय बांधण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे परवानगीसह निधीची मागणी केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

तलाठी म्हणजे महसूल विभागाचा ग्रामीण भागातील भक्कम पाया आहे. शेतकऱ्याची प्रत्येक गोष्ट तलाठ्यावर अवलंबून आहे. त्यात सातबारा उतारे ८ अ चे उतारे तसेच इतर विविध दाखल्यासाठी त्यांच्याकडे जावे लागते. तसेच विविध महसुली प्रकरणे, पीक पाणी नोंदी हे त्यांच्यावरच अवलंबून आहे.

अशा तलाठ्यासाठी त्यांना स्वतंत्र कार्यालय नाही, त्यामुळे अडचणी येतात. सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी रत्नाकर गायकवाड यांच्या कार्यकाळात ४७ ठिकाणी तलाठी सज्जे होते. त्यानंतर त्याचे विस्तारीकरण होऊन ५५ झाले. सध्या अनेक तलाठी कार्यालये ही ग्रामपंचायतीच्या, विविध कार्यकारी सोसायटीच्या जागेत आहेत.

तालुक्यात सध्या २८ ठिकाणी ग्रामपंचायत व इतर विभागाच्या शासकीय जागेत कार्यालय सुरू आहेत. मात्र १९ ठिकाणी कार्यालय नाहीत. स्वतंत्र तलाठी कार्यालय झाली तर उपजिल्हाधिकारी तहसीलदार, मंडल निरीक्षक यांच्या सारख्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी येऊन काही अडचणीचे प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे.

आमदार माने यांनी महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे तलाठी कार्यालयाच्या बांधकाम व निधीची मागणी करताच कक्ष अधिकाऱ्यांकडून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना तशा आशियाचे पत्र प्राप्त झाले असून, त्यात वस्तुस्थितीची माहिती व तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मोहोळ तालुक्यातील विविध गावात नव्याने तलाठी कार्यालये झाली तर कामात सुसूत्रता येणार आहे. तसेच शेतकऱ्यांनाही हे सोयीचे होणार आहे
- सी. बी. अचलारे, अध्यक्ष, मोहोळ तालुका तलाठी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT