G-20 Conference Agrowon
ॲग्रो विशेष

G-20 Conference : जी -२० परिषदेसाठी आलेल्या प्रतिनिधींनी घेतला निरोप

जिल्हा प्रशासनाने ‘जी -२०’ बैठकीसाठी आलेल्या महिला शिष्टमंडळातील प्रतिनिधींचे महाराष्ट्रीय पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : शहरात जी -२० (G-20 Conference) च्याअंतर्गत वूमन -२०’ या दोनदिवसीय परिषदेसाठी आलेल्या परदेशी महिला प्रतिनिधींनी बुधवारी (ता.१) छत्रपती संभाजीनगर शहराचा निरोप घेतला.

छत्रपती संभाजीनगरीतून मंगळवारी (ता. २८) सायंकाळच्या विमानाने एकूण १६ महिला प्रतिनिधींना जिल्हा प्रशासनाच्या वतीने निरोप देण्यात आला. तर बुधवारी (ता.१) उर्वरित प्रतिनिधींनी सकाळपासून वेगवेगळ्या वेळी प्रयाण केले.

जिल्हा प्रशासनाने ‘जी -२०’ बैठकीसाठी आलेल्या महिला शिष्टमंडळातील प्रतिनिधींचे महाराष्ट्रीय पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. संगीतमय वातावरणात, लेझीमच्या तालात पुष्पहार, पैठणी, शेले देऊन केलेल्या स्वागताने त्या भारावून गेल्या होत्या.

प्रत्येक शासकीय विभागाने दिलेली जबाबदारी सांभाळत पाहुण्याची काळजी घेतली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, पोलिस अधीक्षक मनीष कलवानीया यांच्या नेतृत्वात प्रत्येक विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान यामध्ये राहिले.

शहर व शहरालगत असलेल्या सांस्कृतिक, ऐतिहासिक वारशाचे म्हणजेच वेरूळ लेणी, बिबी का मकबरा या ठिकाणी पाहुण्यांनी पर्यटनाचा आनंद घेतला.

चैर्ली मिलर, गॅल्याडीस नायर, शाझिया खान, तविशी सिंग, समंथा जान, लिंडा लॉरा शब्दानी, दीपा अहलुवालिया, फ्रान्सिस तोरनेअरी, ॲमू सॅन्याल, हॅरियाना हुताबरत, शमिका रावी, सोलडॅड हेरिरॉवो, गायत्री वासुदेवन, सुशेन जान फर्ग्युसन, कांता सिंग, जयन मेहता, नीता इनामदार, स्वामिनाथन, वेरीना दि तिमारा, फराह अरब, इस्तानी सुरानो, ॲनी ॲन्जिलिया, क्रिस्तान्ती, नरिनी बोल्हर, इशिता, कार्लो सोल्डाटीनी, स्टिफानो डी टरगीला, कॅर्थीना मिलर, इल्वीरा मारास्को, शेविम किया, मधुसेन लक्ष्मी व्ही. टी, जानाभी फोकन, केलसे हॅरिस, सुहाभी, निधी गुप्ता, पूर्वी ठक्कर, ज्यलियन रोझीन, आयेशा अख्तर आदींचा परदेशी प्रतिनिधींमध्ये समावेश होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Heavy Rain: मुसळधार पावसाने झोडपले; धरणांतून विसर्ग

Legislature Adjourned: विधिमंडळाचे कामकाज काही मिनिटांतच तहकूब

Ashadhi Wari 2026: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान

Maharashtra Agriculture Sowing: राज्यात ३९ टक्के पेरण्या पूर्ण

Monsoon Disaster: बारा जणांचे मृत्यू सुलतानी कारभारामुळे; काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका

SCROLL FOR NEXT