Fruit Crop Insurance Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : फळपीक विमा कधी भेटणार? ; मागील हंगामातील केळी उत्पादक प्रतीक्षेत

Banana Crop Insurance : केळी उत्पादकांनी काढलेला पीकविमा अद्यापही खात्यावर जमा झालेला नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Team Agrowon

केळी उत्पादकांनी काढलेला पीकविमा अद्यापही खात्यावर जमा झालेला नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. दरवर्षी नवीन फळपीक विमा सप्टेंबरमध्ये काढण्यापूर्वी जुनी मदत खात्यात जमा झालेली असते. यंदा या फळपीकविम्याचा अद्याप काहीही थांगपत्ता नाही. प्रामुख्याने केळी उत्पादक प्रतीक्षा करीत आहेत.

केळी उत्पादकांना मागील हंगामातील नुकसानासाठी फळपीक विमा ऑगस्टपूर्वी जमा होत असतो. त्यानंतर सप्टेंबरमध्ये नवीन हंगामासाठी शेतकरी विमा उतरवितात. गेल्या वर्षात जिल्ह्यात सुमारे दोन हजार शेतकऱ्यांनी केळी पिकाचा विमा उतरविला होता. तेव्हा केळी पिकाला वातावरणाचे वेगवेगळे ट्रिगर लागलेले आहेत, असे उत्पादकांकडून सांगण्यात येते.

काही ठिकाणी थंडी तसेच अति उष्णतेची झळ बसली होती. यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून शेतकरी पीकविम्याची प्रतीक्षा करीत आहेत. दुसऱ्या हंगामासाठी विमा काढलेला असतानाही मागील हंगामाचीच मदत मिळालेली नसल्याची वस्तुस्थिती आहे. या बाबत कृषी विभाग तसेच विमा कंपनीकडून सबुरीचा सल्ला देण्यात येत आहे.

मागील हंगामासाठी केळी पिकाचा पीकविमा मिळालेला नाही. आम्ही नवीन पीकविमा काढला आहे. मदतीला उशीर होत असल्याचे पहिल्यांदाच घडते आहे. पीकविमा कधी मिळेल याची माहिती कोणीही द्यायला तयार नाही. तसेच मनरेगाअंतर्गत हिवरखेड मंडलासाठी निधी प्राप्त होऊनही शेतकऱ्यांपर्यंत पोचलेला नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी या बाबत सकारात्मक कार्यवाही करण्याची गरज आहे.
- सचिन कोरडे, केळी उत्पादक, हिंगणी, ता. तेल्हारा, जि. अकोला
‘मनरेगा’चे चुकारे

केव्हा मिळणार
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेतून केळी लागवडीला अनुदान दिले जाते. योजनेतून केळीची लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी शासकीय मदत तालुक्यांना वळती झालेली. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी टाकल्या जात नसल्यानेही आश्‍चर्य व्यक्त केल्या जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT