Wild Animal Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Wild Life Crop Damage : रोही, हरिण, रानडुक्करांचा हैदोस ; शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान

Crop Damage : यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात कमालीची घट झाली. आता रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची मदार आहे.

Team Agrowon

Buldana News : तालुक्यातील गिलोरी येथील शेतकरी पंजाब राघो चव्हाण यांच्या शेतातील मका पिकाची वन्यप्राण्यांनी मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे. त्यामुळे चव्हाण यांचे अतोनात नुकसान झाले आहे. वनविभागाने त्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी. तसेच वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात कमालीची घट झाली. आता रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची मदार आहे. अनेक शेतकऱ्यांनी अल्प जलस्रोत व विहिरीतील पाण्याच्या भरवशावर रब्बी पिकांची लागवड केली आहे.

यामध्ये मका, गहू, ज्वारी, हरभरा व इतर रब्बी पिकांचा समावेश आहे. परंतु रोही, हरिण, रानडुक्कर आदी वन्य प्राण्यांचे कळप उभ्या पिकात शिरून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करीत आहेत.

त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. तालुक्यातील गिलोरी येथील शेतकरी पंजाब राघो चव्हाण यांनी एक हेक्टर क्षेत्रात मका पिकाची लागवड केली होती. आता पीक जोमात असताना वन्यप्राण्यांनी त्यांच्या उभ्या पिकात धुमाकूळ घातला.

त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वनविभागाने शेतकरी चव्हाण यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी. तसेच वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

तालुक्यातील गिलोरी या गावाला ज्ञानगंगा अभयारण्याच्या सीमा संलग्न आहेत. त्यामुळे या परिसरात वन्यप्राणी व हिंस्रप्राण्याचा मुक्तसंचार दिसून येतो. वन्यप्राण्यांचे कळप उभ्या पिकात शिरून धुमाकूळ घालत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Cycle Process: जलशास्त्र : पाण्याच्या प्रवासाचे विज्ञान

Soil Health Management: जमीन सुपोषण ही काळाची गरज : डॉ. इंद्र मणी

Farming Tips: कोरडवाहू शेतात दीर्घकाळ ओलावा टिकवण्यासाठी विविध पद्धती

Youth Congress Protest: मुदखेडमध्ये युवक काँग्रेसचा गाढव मोर्चा

Farm Loan Waiver: ३२ लाख शेतकऱ्यांची फसवणूक, त्यांची ५० हजारांवर बोळवणूक, कर्जमाफीवरून अजित नवलेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT