Lumpy Skin Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Gujarat: लंपी त्वचा रोगामुळे दूध उत्पादनात घट

गुजरात राज्यात जनावरांमध्ये लंपी त्वचा रोगाचा झपाट्याने प्रसार झाला आहे.

Team Agrowon

गुजरात राज्यात जनावरांमध्ये लंपी त्वचा रोगाचा (Lumpy Skin Disease) झपाट्याने प्रसार झाला आहे. या रोगामुळे गेल्या तीन-चार महिन्यांत दीड हजारांपेक्षा अधिक गायींचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण ३३ जिल्ह्यांपैकी २० जिल्ह्यांमध्ये लंपी त्वचा रोग पसरला आहे. यातील बहुतेक जिल्हे दूध उत्पादनात अग्रेसर आहेत. त्यामुळे राज्याच्या दूध उत्पादनात (Milk Production) मोठी घट झाली आहे.

सौराष्ट्रातील रोजच्या दूध संकलनात दोन ते तीन टक्के घट झाली आहे. या रोगाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव कच्छ जिल्ह्यात झाला. राज्यात लंपी त्वचा रोगाची लागण झालेल्या जनावरांची संख्या ५४ हजारांच्या घरात आहे. त्यापैकी एकट्या कच्छ जिल्ह्यात सुमारे ३८ हजार जनावरे आढळून आली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मंगळवारी (ता. २) कच्छला भेट देऊन उपचार आणि लसीकरणाची पाहणी केली.

गुजरात शासनातर्फे रोग व्यवस्थापनासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. प्रादुर्भाव झालेल्या जनावरांचे विलगीकरण करुन त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. जास्तीत जास्त जनावरांचे लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. जनजागृती आणि रोगाच्या माहितीसाठी शासनातर्फे टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक सुरु करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात लंपी रोगाशी संबंधित १५ हजारांहून अधिक कॉल आल्याची नोंद करण्यात आली. यावरुन या रोगाचा प्रसार किती वेगाने होत आहे हे दिसून येते.


काय आहे लंपी त्वचा रोग?

हा रोग देवी विषाणू गटातील कॅप्रीपॉक्स या विषाणूमुळे होतो. माशा, डास, गोचीड इ. द्वारे हा आजार एका जनावरापासून दुसऱ्या जनावरास होतो. हा रोग उष्ण व दमट वातावरणात जास्त होतो.

लक्षणे कशी ओळखावीत?
हा विषाणूजन्य रोग असल्याने बाधित जनावरे अशक्त होतात. जनावरांचे दूध घटते. प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. जनावराला ताप येतो, डोळ्यातून व नाकातून पाणी येते. यानंतर जनावराच्या सर्व शरीरावर कडक आणि गोल आकाराच्या गाठी येतात.


उपचार काय आहेत?
बाधित जनावराच्या त्वचेवरील व्रण, नाकातील स्राव, दूध, लाळ, वीर्य, इ. माध्यमामार्फत हा रोग निरोगी जनावरांत पसरतो. त्यामुळे बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणे आवश्यक आहे. हा रोग विषाणूजन्य असल्याने यावर खात्रीशीर उपचार होऊ शकत नाहीत. त्यामुळे जनावरांचे पशुतज्ज्ञांकडून लसीकरण करणे हाच खात्रीशीर उपाय आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani DCC Bank Election: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ जागांचे निकाल जाहीर

CSC Crop Insurance Services: विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका : दत्तकुमार कळसाईत

Paddy Transplantation: डहाणू तालुक्यात पावसाच्या विश्रांतीने बळीराजा शिवारात

Road Widening Project: मोहोळ-वळसंग रस्ता रुंदीकरणासाठी ९२ हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन

MIDC Industries Face Warning: शेतीचे नुकसान; रासायनिक कंपन्यांना इशारा

SCROLL FOR NEXT