Cotton Market Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Market : कापसाच्या किमतीत घसरता कल

Cotton Rates : सेबीच्या आदेशाने अखेर MCX मध्ये कापसासाठी मार्च डिलिव्हरीसाठी ८ डिसेंबरपासून व्यवहार सुरू झाले. यामुळे कापसासाठी आता जानेवारी व मार्च डिलिव्हरीसाठी व्यवहार उपलब्ध आहेत.

Team Agrowon

फ्यूचर्स किमती ः सप्ताह २ ते ८ डिसेंबर २०२३

Cotton Prices : सेबीच्या आदेशाने अखेर MCX मध्ये कापसासाठी मार्च डिलिव्हरीसाठी ८ डिसेंबरपासून व्यवहार सुरू झाले. यामुळे कापसासाठी आता जानेवारी व मार्च डिलिव्हरीसाठी व्यवहार उपलब्ध आहेत. दोन्ही एक्स्चेंजमध्ये मिळून सध्या कापूस, कपास, मका व हळद यांचे फ्यूचर्स व्यवहार सुरू आहेत. ऑप्शनसाठी मका व हळद यांचे व्यवहार करता येतात.

ऑक्टोबरनंतर कापसाच्या किमतीत घसरता कल आहे. सोयाबीनच्या किमती वाढत आहेत. सोयाबीनची आवकसुद्धा कमी झाली आहे. मका व कापूस यांची आवक वाढती आहे. तुरीची किंमत कमी होत आहे. कांदा व टोमॅटो यांच्या किमती वाढू लागल्या आहेत.

८ डिसेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात १.१ टक्क्याने घसरून रु. ५५,८०० वर आले होते. या सप्ताहात ते ०.३ टक्क्याने घसरून रु. ५५,६६० वर आले आहेत. जानेवारी फ्यूचर्स भाव ०.१ टक्क्याने वाढून रु. ५७,३०० वर आले आहेत. मार्च फ्यूचर्स भाव रु. ५८,००० वर आहेत.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात ०.६ टक्क्याने घसरून रु. १,४३१ वर आले आहेत. फेब्रुवारी भाव रु. १,५३० वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५६७ वर आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ९.५ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत.

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) गेल्या सप्ताहात रु. २,१८० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.९ टक्क्याने वाढून रु. २,२०० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (जानेवारी डिलिव्हरी) किमती रु. २,२१८ वर आल्या आहेत. मार्च फ्यूचर्स किमती रु. २,२४५ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.६ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे. मक्याची देशातील आवक वाढती आहे; पण मागणीसुद्धा वाढत आहे.

हळद

NCDEX

मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात रु. १३,४६७ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.७ टक्क्यांनी घसरून रु. १३,१०७ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. १४,६४४ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ११.७ टक्क्यांनी जास्त आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती या सप्ताहात ०.८ टक्क्याने वाढून रु. ६,०५० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ८,६२५ वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे. आवक आता कमी होत आहे.

सोयाबीन

गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) रु. ५,१०१ वर आली होती. या सप्ताहात ती याच पातळीवर आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) या सप्ताहात ९.७ टक्क्यांनी कमी होऊन रु. ९,१७५ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. गेल्या दोन महिन्यांत तुरीच्या किमती वाढत होत्या; मात्र त्या सध्या कमी होत आहेत.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. ३,९२० होती. या सप्ताहात येथील किंमत रु. ३,८६० वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. १,९४० वर आली होती. या सप्ताहात ती रु. २,००० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT