Mango Production Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Amboshi Production : अलिबागमध्ये आंबोशीच्या उत्पादनात घट

मासळीच्या कालवणाला आंबट, तिखट चव आल्यास जेवणाची लज्जत आणखीन वाढते. कोकणातील गृहिणी कालवणाला आंबटपणा येण्यासाठी चिंच आणि गावठी आंब्यापासून तयार केलेले आंबोशी सर्रास वापरतात.

Team Agrowon

Alibaug News : मासळीच्या कालवणाला आंबट, तिखट चव आल्यास जेवणाची लज्जत आणखीन वाढते. कोकणातील गृहिणी कालवणाला आंबटपणा येण्यासाठी चिंच आणि गावठी आंब्यापासून तयार केलेले आंबोशी सर्रास वापरतात. या वर्षी रायवळ आंब्याचा भर सुमार आहे.

त्याचबरोबर जंगल भागात आंब्याच्या झाडांची संख्या कमी झाल्याने आंबोशी तयार करण्यासाठी कच्च्या कैऱ्या मिळणे कठीण झाले आहे. याचा परिणाम म्हणून आंब्याच्या आंबोशीची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.

आंबट, खारट आंब्याच्या आमसुलाची चव ज्यांनी चाखली आहे, ते नागरिक या आमसुलाची विचारणा हमखास करतात. जेव्हा कोकणात हापूसचा प्रस्त वाढलेला नव्हता तेव्हा रायवळ आंब्यांना मोठी मागणी होती.

येथील लाल मातीत वाढणाऱ्या प्रत्येक झाडावरील आंब्याची चव, आकार वेगवेगळा असल्याने कोकणात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. रायवळी, तोतापुरी, रत्ना, लंगडा, आंबट्या, खोबऱ्या अशी अनेक नावे तेथील बोलीभाषेनुसार पडलेली आहे.

यातील रायवळी, रत्ना, आंबट्या अशा नावाची फळे आंबोशीसाठी सर्रास वापरली जातात. कच्च्या फळांची साळ आणि आतील बी काढून ती सुकवावी लागतात.

जास्त दिवस टिकावी म्हणून मीठ लावून त्यांचे गोळे तयार केले जातात. असे गोळे बाजारात विकणाऱ्या महिला हमखास दिसत. दुसऱ्या राज्यातूनही कोकणातील विशिष्ट चवीच्या आंबोशीला मागणी होती. मात्र, अलीकडे बाजारात आंब्याची आंबोशी शोधूनही

मिळत नाही. पूर्वी पोयनाड, इंदापूर, खोपोली, नागोठणे बाजारपेठेमध्ये आंब्याच्या आमसुलाची आवक मोठ्या प्रमाणात होती. ही आवक आता २५ टक्क्यांवर आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT