GST Council Meeting  Agrowon
ॲग्रो विशेष

GST Council Meeting : सणासुदीच्या तोंडावर जीएसटी कौन्सिलने वाढवला गोडवा ; गुळासह या वस्तूंवरील घटला कर

GST Council Decides : जीएसटी कौन्सिलची 52वी बैठक आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली, ज्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली.

Swapnil Shinde

GST Council big decisions : सणासुदीच्या तोंडावर लोकांना खुश करण्यासाठी जीएसटी कौन्सिलने अनेक उपाययोजना राबवल्या आहेत. आज झालेल्या परिषदेच्या बैठकीत गुळासह अनेक उत्पादनांवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी कौन्सिलच्या 62 व्या बैठकीनंतर संध्याकाळी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, गुळावरील जीएसटी दर ५ टक्के करण्यात आला आहे. आतापर्यंत गुळावर २८ टक्के कर आकारला जात होता. त्याचप्रमाणे शिवणकाम आणि भरतकामात वापरल्या जाणाऱ्या झारी धाग्यावरील जीएसटी दर १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. जीएसटी कौन्सिलने मिलेट म्हणजेच भरड धान्यावरील करासंदर्भातही निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर मोलॅसिसवरील जीएसटी दर २८% वरून ५% पर्यंत कमी करण्यांत आला. त्यामुळे साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे.

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, जर एखाद्या उत्पादनामध्ये ७० टक्के भरड धान्य वापरले गेले असेल तर त्यावर कोणताही कर आकारला जाणार नाही. पण, भरड धान्याच्या ब्रँडेड उत्पादनांवर ५ टक्के दराने कर आकारला जाईल. आतापर्यंत ब्रँडेड आणि प्री-पॅकेज केलेल्या उत्पादनांवर १८ टक्के कर आकारला जात होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Delay Impact: मॉन्सूनच्या पावसाअभावी उन्हाचा चटका तापदायक

Sesame Auction: सेलू उपबाजारात दर शनिवारी होणार तिळाचे लिलाव

Agri Department Tranfers Delay: आकृतिबंधाच्या आडून बदल्यांना खो; पात्रता, निकडीची कारणे असूनही कृषी विभागाकडून अडवणूक

Hormuz Strait Crisis: ‘हालचाली थांबवा, अन्यथा कारवाई’; इराणी नौदलाचा व्यापारी जहाजांना इशारा

Global Agriculture Trade: अन्नधान्य उत्पादन विक्रमी; पण पुरवठ्याची कासवगती, होर्मुझ तणावामुळे वाहतूक महागली

SCROLL FOR NEXT