Fertilizer Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Shortage : कृषी साहित्य विक्रेत्यांनी केंद्रीय मंत्र्यांसमोर वाचला अडचणींचा पाढा

Fertilizer Market : सध्या शेतकऱ्यांकडे साठवणूक करण्याची क्षमता नसल्यामुळे व विक्रेत्यांकडेही तितका साठा नसल्यामुळे खतांचा तुटवडा होतो आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : कृषी व्यवस्थेतील सुधारणा व शेतकऱ्यांना सेवा पुरविण्यात येणाऱ्या अनेक अडचणी व आव्हानांची मांडणी जिल्हा कृषी साहित्य विक्रेता असोसिएशनने केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासमोर मांडल्या.

त्यांनी म्हटले, की खताचे परिवहन करत असताना पोच भाडे ते भरतात. परंतु जेवढे भाडे लागते तेवढे मिळत नाही. हा खर्च खासगी ट्रान्स्पोर्टर्ससाठी जास्त असल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक भार पडत, असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. खताचा दरात चढ-उतार होतात. परंतु त्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या दराची निश्‍चिती आहे.

ते दराच्या चढ-उताराप्रमाणे कमी अधिक होत नाही. त्यामुळे दर पुनरवलोकन करून योग्य त्यातून मिळणाऱ्या नफ्याची दर निश्‍चित करावी. सध्या शेतकऱ्यांकडे साठवणूक करण्याची क्षमता नसल्यामुळे व विक्रेत्यांकडेही तितका साठा नसल्यामुळे खतांचा तुटवडा होतो आहे. त्यामुळे खतांचा योग्य वेळी पुरवठा करणे अशक्य होत आहे.

महाराष्ट्र राज्याला दिलेले वाटप पूर्ण प्रमाणात न मिळाल्यामुळे राज्याला वाटप केलेली खतांची अंदाजित मात्रा पूर्ण प्रमाणात मिळत नाही, त्यामुळे दरवर्षी खताचा तुटवडा जाणवतो. आपण दिलेल्या वाटपात, खालील प्रमाणात खत उपलब्ध करून दिले जावे, असेही असोसिएशनने केली आहे.

या सर्व विषयात आपण सकारात्मक निर्णय घ्यावा व शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध व्हावे, त्यासाठी आम्ही नेहमी चर्चेसाठी तयार आहोत. योजना राबवताना अडथळे येऊ नयेत अशी अपेक्षाही कृषी साहित्य विक्रेता असोसिएशन मी व्यक्त केली आहे.

केंद्रीय मंत्र्यांना निवेदन देते वेळी कृषी साहित्य विक्रेता असोसिएशनचे सल्लागार जगन्नाथ काळे, अध्यक्ष प्रकाशचंद्र मुथा, उपाध्यक्ष नरेंद्र बापू पाटील सचिव सुदामराव राऊत आदींची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT