Loan Waive Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Incentive Subsidy : आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांना शनिवारपर्यंत मुदत

Aadhar Authentication : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही.

Team Agrowon

Amaravati News : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही. त्यामुळे ते लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी सात सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना म्हणजे विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही.

महाआयटीने या शेतकऱ्यांना प्रमाणीकरणाची सुविधा १२ ऑगस्टपासून उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा सात सप्टेंबरपर्यंत राहणार असून या कालावधीत त्यांनी सेतू केंद्रावरून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी केले आहे.

जिल्ह्यामध्ये अद्याप ४५० पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही. या पात्र शेतकऱ्यांनी त्यांचा विशिष्ट क्रमांक संबंधित बॅंक किंवा तालुक्यातील सहायक निबंधक कार्यालयातून अवगत करून सेतू केंद्राहून पोर्टलवर आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तालुकानिहाय शेतकरी

अमरावती ः ४३ , चांदूरबाजार ७६, चांदूररेल्वे ः ३३, तिवसा ः ११, नांदगाव खंडेश्वर ः २५, मोर्शी ः ४९, धारणी ः २२, अचलपूर ः १५, धामणगावरेल्वे ः ३५, अंजनगावसुर्जी ः ३०, दर्यापूर ः ४१, वरुड ः ३५, भातकुली ः ३४, चिखलदरा ः १

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Census : राज्यात आजपासून २१ व्या पशुगणनेस सुरुवात

Chili Crop Damage : नंदुरबारात मिरचीला नैसर्गिक आपत्तीचा फटका

Weather Update : किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता

Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

SCROLL FOR NEXT