Agriculture Electricity Connection agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : गडचिरोली जिल्ह्यात मिळणार शेतीला दिवसा वीजपुरवठा

Agriculture Electricity Issue : या मागणीची तत्काळ दखल घेत वन अणि नक्षलप्रवण गडचिरोली जिल्हयात शेतीला दिवसा बारा तास वीजपुरवठा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी महावितरणला दिले.

Team Agrowon

Gadchiroli News : जिल्ह्यात शेती करताना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने कृषिपंपाला दिवसा वीजपुरवठा करण्याचे धोरण या जिल्ह्यात असावे, अशी मागणी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आमदार कृष्ण गजबे यांनी ही मागणी केली.

या मागणीची तत्काळ दखल घेत वन अणि नक्षलप्रवण गडचिरोली जिल्हयात शेतीला दिवसा बारा तास वीजपुरवठा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी महावितरणला दिले. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आमदार गजबे यांच्या मागणीनुसार, गडचिरोली जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने आणि धानाची शेती होते. जिल्ह्यात दुर्गम, नक्षलप्रवण गडचिरोली जिल्ह्यात ७८ टक्‍के जंगल आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा सातत्याने वावर असल्याने शेती करताना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते.

या काही भागात नजीकच्या काळात शेतकरी व्यावसायिक पिकांकडे देखील वळले आहेत. त्याकरिता सिंचनाचे स्रोतही त्यांनी बळकट केले. पाणी देण्यासाठी कृषिपंपही बसविले आहेत. सध्या शेतकऱ्यांची रब्बीची लगबग सुरू आहे. मात्र नरभक्षक वाघ व रानटी हत्तींनी या भागात धुमाकूळ घातला आहे.

गडचिरोली तालुक्‍यात दोन शेतकऱ्यांना वाघाने ठार केले. गेल्या तीन महिन्यांत रानटी हत्तींनी दोन शेतकऱ्यांसह वनविभागाच्या एक वाहनचालकाचा बळी घेतला. अशा स्थितीत रात्रीच्यावेळी ओलितासाठी शेतात जाणे जिकरीचे ठरत आहे. ही बाब लक्षात घेता दुर्गम आणि नक्षलप्रवण भागासाठी विशेष बाब म्हणून शेतीला दिवसा १२ तास वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

आता दिवसा वीजपुरवठा

आमदार गजबे यांची ही मागणी न्याय्य असल्याने त्याची तत्काळ दखल घेत गडचिरोली जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत सकाळी ६ ते सायंकाळी ६ असा १२ तास वीजपुरवठा करण्याचे निर्देश महावितरणला देण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT