Agriculture Pump Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Problem In Sangli : कृषिपंपाची दिवस-रात्रीची वीज होतेय ‘गुल’

Electricity Supply : महावितरणकडून शेतीसाठी दिवसा आठ तास, तर रात्रीच्या वेळी दहा तास वीजपुरवठा केला जात आहे.

Team Agrowon

Sangli Electricity Issue : महावितरणकडून शेतीसाठी दिवसा आठ तास, तर रात्रीच्या वेळी दहा तास वीजपुरवठा केला जात आहे. त्यातून दिवसा आणि रात्री होणारा वीजपुरवठाही खंडित होत आहे.

काही वेळेस भारनियमनही होत असल्याने पाणी असूनदेखील पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेती पिकांना पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

महावितरणकडून कृषिपंपासाठी दिवसा आठ तास तर रात्रीच्या वेळी दहा तास वीजपुरवठा केला जातो. त्यामध्ये रात्रीच्या वेळी आठ वाजता कृषिपंपाची वीज येते, तर काही वेळेस नऊ किंवा दहा वाजता वीजपुरवठा केला जातो. त्यानुसार शेतकरी पिकांना पाणी देण्याचे नियोजन करतात.

जिल्ह्यातील सध्या वीज पुरवठ्याचे वेळापत्रक पाहिले असता पाण्याची पुरेशी उपलब्धता असूनही खंडित वीजपुरवठ्यामुळे बहुतांश भागांतील पिकांना पाणी देण्यासाठी अडचणी येत आहेत.

जिल्ह्यातील दुष्काळी आणि पाण्याने सधन भाग असे दोन भाग आहेत. सध्या दुष्काळी भागातील पाणी टंचाई दूर व्हावी, यासाठी ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ योजना सुरू कररून शेतीला पाणी उपलब्ध करून दिले आहे.

मात्र, सध्या वाढत्या उन्हाळ्यामुळे भूजल पातळी घटू लागली आहे. त्यातूनहीं शेतकरी शेतीला पाणी देण्याचे काटेकोर नियोजन करत असल्याचे चित्र आहे.

पिकांना वारंवार पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर महावितरणने कृषिपंपांना दिवसा बारा तास वीजपुरवठा करावा, अशी मागही शेतकरी करू लागले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT