Farmer Protestor Jagjitsingh Dallewal  Agrowon
ॲग्रो विशेष

51st Day Of Protest : डल्लेवाल यांच्या उपोषणाचा ५१ वा दिवस; १११ शेतकऱ्यांचा जथ्था काळे कपडे घालून बसणार उपोषणाला

Black Clothes Protest : डल्लेवाल यांच्या उपोषणाचा आज ५१ दिवस आहे. मागील ४८ तासात डल्लेवाल यांना पाणी पिण्यास त्रास होत असून त्यांच्या शरीरातील अवयव प्रतिसाद देत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

Dhananjay Sanap

Farmers Protest: संयुक्त किसान मोर्चा राजकीयचे नेते जगजितसिंह डल्लेवाल यांची प्रकृती अधिक खालावली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज ५१ दिवस आहे. मागील ४८ तासात डल्लेवाल यांना पाणी पिण्यास त्रास होत असून त्यांच्या शरीरातील अवयव प्रतिसाद देत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. मात्र अद्यापही केंद्र सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे संतप्त शेतकरी नेत्यांनी सरकारचा निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुपारी २ वाजता १११ शेतकऱ्यांचा काळे कपडे घातलेला जथ्या सीमेवरील पोलिस बॅरीकेडस जवळ शांततेत आमरण उपोषण सुरू करणार आहेत.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार डल्लेवाल यांच्या शरीरातील बहुतांश अवयव निकामी होऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांनी पाणी पिलं तरी त्यांना उलटी होत आहे. त्यामुळे डल्लेवाल पाणी देखील पित नाहीत, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

जगजितसिंह डल्लेवाल यांच्या प्रकृती संदर्भात केस आणि याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागील ५१ दिवसांपासून डल्लेवाल विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. या मागण्या संदर्भात डल्लेवाल यांनी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली आहे.

या याचिकेत केंद्र सरकारला पिकांच्या हमीभाव खरेदीचा कायदा करण्यास आदेश देण्याच्या मागणीचा समावेश आहे. २०२१ मध्ये केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द केल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांना हमीभाव कायद्याचे आश्वासन दिल्याचाही दावा याचिकेत करण्यात आलेला आहे. यावर आज न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायामूर्ती एन कोटीश्वर सिंह यांचं खंडपीठ सुनावणी करणार करणार आहे.

दरम्यान, डल्लेवाल यांची प्रकृती चिंताजनक असल्याने शेतकरी नेते आणि शेतकरी डल्लेवाल यांच्या भेटीसाठी सीमेवर दाखल होत आहे. हमीभाव कायद्याबद्दल शेतकऱ्यांशी चर्चा करण्याऐवजी भाजपचे नेते शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचाही आरोप शेतकरी करत आहेत. मंगळवारी हरियाणा येथील कैथल जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी डल्लेवाल यांची भेट घेतली. त्यावेळी डल्लेवाल यांच्या मार्गावर चालत असून त्यांच्यासाठी बलिदान देण्यास तयार असल्याचं सांगितलं. तर हरियाणातील व्यापारी मंडळाच्या कार्यकारणीने डल्लेवाल यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Shortage Issue: वरकुटे खुर्द, सराफवाडी पाझर तलाव कोरडा

20th Bhimthadi Jatra: पुण्यात १६ डिसेंबरपासून २० वी भीमथडी जत्रा

PDCC Bank Support: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व पातळ्यांवर पुढाकार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Agriculture Officer Suspended: चुकीच्या मूल्यांकनप्रकरणी कृषी अधिकारी निलंबित

Bharati Plant: जुन्नरमध्ये दुर्लक्षित वनस्पतीला ‘भारती’ नावाने मिळाली ओळख

SCROLL FOR NEXT