Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Daund Sugar : ‘दौंड शुगर’चे २० लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

Sugarcane Season : दौंड शुगर साखर कारखान्यांच्या वतीने सन २०२३-२४ मध्ये गाळप झालेल्या उसाला १०० रुपये प्रतिटनाप्रमाणे अंतिम हप्ता शेतकऱ्यांना लवकरच देण्यात येणार आहे.

Team Agrowon

Pune News : ‘‘दौंड शुगर साखर कारखान्यांच्या वतीने सन २०२३-२४ मध्ये गाळप झालेल्या उसाला १०० रुपये प्रतिटनाप्रमाणे अंतिम हप्ता शेतकऱ्यांना लवकरच देण्यात येणार आहे. कारखान्याचा मागील हंगामाचा ३००० रुपये अंतिम भाव झाला आहे.

चालू गळीत हंगामात कारखान्यांने २० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे,’’ अशी माहिती कारखान्यांचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी दिली.

आलेगाव (ता.दौंड) येथील कारखान्यांच्या १६ व्या गळीत हंगामातील बॉयलर अग्निप्रदीपन व गळीत हंगामाचा प्रारंभ पाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आला.

अग्निप्रदीपन दौंडचे माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे व त्यांच्या पत्नी उमादेवी जगदाळे तसेच आबासाहेब सुरवसे व त्यांच्या पत्नी स्वाती सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले. गळीत हंगामाचा प्रारंभ अध्यक्ष जगदीश कदम यांच्या हस्ते करण्यात आला.

कारखान्यांची सन २०२४-२५ हंगामातील तयारी पूर्ण झाली असून, १५ नोव्हेंबरपासून गाळप सुरू होणार आहे. कार्यक्रमाला कारखान्यांचे पूर्णवेळ संचालक शहाजी गायकवाड, डॉ. संगीता जगदाळे, मल्हार जगदाळे, आर्यन कदम, प्रदुग्न जोशी, शशिकांत गिरमकर, दीपक वाघ, दिलीप बोडखे, चंद्रकांत सुद्रिक, संदेश बेनके उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT