Daund Sugar Factory  Agrowon
ॲग्रो विशेष

Daund Sugar Factory: ‘दौंड शुगर’कडून पहिला हप्ता प्रति टन २८०० रुपये वर्ग

Chairman Jagdish Kadam: दौंड तालुक्यातील आलेगाव येथील दौड शुगर कारखान्याने २०२४-२५ च्या गळीत हंगामात गळितास आलेल्या उसाची पहिल्या हप्त्यासाठी २ हजार ८०० रुपये प्रति टन याप्रमाणे बँकेत वर्ग करण्यात येत असल्याचे कारखान्याचे चेअरमन जगदीश कदम यांनी सांगितले.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : दौंड तालुक्यातील आलेगाव येथील दौड शुगर कारखान्याने २०२४-२५ च्या गळीत हंगामात गळितास आलेल्या उसाची पहिल्या हप्त्यासाठी २ हजार ८०० रुपये प्रति टन याप्रमाणे बँकेत वर्ग करण्यात येत असल्याचे कारखान्याचे चेअरमन जगदीश कदम यांनी सांगितले.

दौंड शुगर कारखान्याने २०२४-२५ च्या चालू गळीत हंगामात १३ जानेवारी २०२५ अखेर एकूण १० लाख २७ हजार ८४५ टन गाळप होऊन ७ सात ७६ हजार ८५० किंटल साखर उत्पादित केली आहे. कारखान्याने १६ नोव्हेंबर २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२४ या पंधरवड्याचे २,६०० रुपये प्रति टन याप्रमाणे यापूर्वी वर्ग केले होते.

तथापि या पंधरवड्यातील फरकाची २०० प्रति टन याप्रमाणे तसेच १ डिसेंबर २०२४ ते १५ डिसेंबर २०२४ या पंधरवड्यातील उसाचे पेमेंट २, ८०० प्रति टनाप्रमाणे पहिल्या हप्त्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांचे बँक खात्यावर वर्ग करण्यात येत आली आहे.

कारखान्याने ६० दिवसांत एकूण १०.२७ लाख टन गाळप केले असून सरासरी प्रति दिन १७ हजार टनाप्रमाणे गाळप होत आहे. यामागील काळात कारखान्याने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करत उत्कृष्ट ऊस दर देण्याची परंपरा कायम राखली असून यापुढील काळातही शेतकरी हिताला प्राधान्य देऊन चांगला ऊस दर देण्याच्या दृष्टीने तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचविणेचे दृष्टीने कारखान्यामार्फत सर्वोतपरी सहकार्य करणेत येईल, अशी ग्वाही देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला ऊस दौंड शुगर कारखान्यास गाळपास देण्याचे आवाहन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT