Paddy Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop Damage : जुन्नरच्या आदिवासी भागात पावसाने भाताचे नुकसान

Paddy Crop : या भागात सध्या भात कापणी व झोडणीची लगबग सुरू आहे. ऐनवेळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. पावसाने भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Team Agrowon

Pune News : तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात रविवारी (ता. २६) सकाळी ७ वाजता पावसाने जोरदार हजेरी लावली. ऐनवेळी आलेल्या अवकाळी पावसामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चावंड, केळी, माणकेश्वर, कुकडेश्वर, पूर, घाटघर, निमगिरी, अंजनावळे, देवळे, खडकुंबे परिसरात पाऊस झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

या भागात सध्या भात कापणी व झोडणीची लगबग सुरू आहे. ऐनवेळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. पावसाने भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी भात पीक खाचरात उभे आहे. काही ठिकाणी कापणी केली आहे, तर काही ठिकाणी झोडणी सुरू आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर देखील सुकाळवेढे परिसरात पावसाने हजेरी लावल्याने मोठे नुकसान झाले. मात्र नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. पीकविमा अर्ज या भागातील अशिक्षित आदिवासी शेतकऱ्यांनी भरलेला नसल्याने पिकांचे नुकसान होऊनही नुकसान भरपाई मिळणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत प्रशासनाने दाखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

पीकविमा योजनेची पुरेशी माहिती आदिवासी भागातील शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने महसूल विभागाने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी आजी-माजी सरपंच संघटनेचे अध्यक्ष पोपट रावते, चावंडचे ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र शेळकंदे, तंटामुक्ती अध्यक्ष अंकुश बांडे , ज्ञानेश्वर लांडे आदींनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT