Paddy Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop Damage : पावसाने भात पिकाचे नुकसान

Maharashtra Rain : सुधागड तालुक्‍यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.

Team Agrowon

Mumbai News : दिवाळीनिमित्त बाजारपेठा सजल्‍या असताना बुधवारी सुधागड तालुक्‍यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्‍यामुळे खरेदीसाठी निघालेल्‍या नागरिकांसह व्यापारी, दुकानदारांची तारांबळ उडाली. तर काही ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू झाला होता.

सध्या भातकापणी, झोडणीची कामे सुरू आहेत. काही शेतकऱ्यांचे पीक अजूनही शेतात आहे तर काहींनी कापणी करून पिके शेतातच ठेवली आहेत. पावसाचे अचानक आगमन झाल्‍याने पिकांचे नुकसान झाले आहे.

व्यापाऱ्यांनी दिवाळीसाठी लाखो रुपयांचा माल दुकानात भरून ठेवला आहे. परंतु पावसामुळे ग्राहकच न आल्‍याने खरेदी झाली नाही. शिवाय दुकानाबाहेर ठेवले सामान भिजल्‍याने व्यापारी हवालदिल झाले आहेत. अजूनही अनेक शेतकऱ्यांचे धान्य शेतातच आहेत. भातपिके वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी धास्‍तावला आहे.

खरेदीवर परिणाम

पावसामुळे फटाके भिजले आहेत. दुकानाबाहेर विक्रीसाठी, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ठेवलेले सामानही खराब झाले आहे. पणत्या, दिवे व रांगोळी ओली झाल्‍याने व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तर कपडे खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्‍याने व्यापारी चिंतेत आहेत.

वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ

पोलादपूर तालुक्यात शेतकरी सध्या कापणीच्या कामांत व्यस्‍त आहे. मात्र बुधवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. कापलेल्‍या भाताला मोड येण्याची शक्यता असल्‍याने शेतकरी चिंतेत आहेत. अचानक आलेल्‍या पावसामुळे काही भागांत जनजीवन विस्कळित झाले तर काही ठिकाणी जवळपास सात ते आठ तास वीजपुरवठा खंडित ठेवला होता.

पावसामुळे पिकाचे नुकसान होण्याची शक्‍यता निळकंठ साने या शेतकऱ्याने व्यक्‍त केली. पावसामुळे लोक खरेदीसाठी बाहेर पडत नाहीत. त्यामुळे बाजारपेठेमध्ये शुकशुकाट आहे. दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांनी पाठ फिरवली तर मोठे नुकसान शक्‍यता आहे. - प्रशांत खैरे, व्यापारी, पाली

शेतामध्ये भाताचे पीक चांगले आले होते. कापणी करून झोडणीची कामे सुरू होती. मुसळधार पावसाचे अचानक आगमन झाले, शेतात भात तसाच ठेवाल्‍याने भिजला असून मोठे नुकसान झाले आहे. शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.
नीलेश शिर्के, शेतकरी, पुई-सुधागड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Digital Farming Training: भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा

Solapur ZP Fund: जि. प., पं. स., सदस्यांना १७१ कोटींची लॉटरी

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

SCROLL FOR NEXT