Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : पांगरी भागातील पिकांना वादळी वाऱ्याचा तडाखा

बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास वादळी वारे चालू झाल्याने घोळवेवाडी येथील आंबा शेतकरी सुखवास घोळवे यांच्या शेतातील आंबे पडून नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Solapur News : पांगरी (ता. बार्शी) भागात बुधवारी (ता. ८) रात्री अकरा वाजल्यापासून गुरुवारी (ता.९) सकाळपर्यंत जोरदार वादळी वाऱ्याचा तडाखा बसला.

त्यामुळे आंबा (mango), केळी, ज्वारी पिकांचे (Jowar Crop) मोठे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घसा निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेला आहे. पांगरी भागात सध्या द्राक्ष विक्रीचा हंगाम सुरू आहे. वातावरणातील बदलांमुळे द्राक्षांना समाधानकारक भाव मिळत नाहीत. त्याचबरोबर कलिंगड, खरबूज ही पिके बेभाव विकावी लागत आहेत.

त्यात बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास वादळी वारे चालू झाल्याने घोळवेवाडी येथील आंबा शेतकरी सुखवास घोळवे यांच्या शेतातील आंबे पडून नुकसान झाले आहे.

नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

शिराळे परिसरात पाण्याची स्थिती चांगली असल्याने अनेक शेतकरी केळीचे उत्पादन घेतात. रात्री अकरा वाजल्यापासून सुरू झालेले वारे सकाळी नऊ वाजेपर्यंत चालूच होते.

या वाऱ्याच्या तडाख्याने केळी बागायतदार अनिल चौधरी, रामकिसन चौधरी, भालचंद्र चौधरी आदी शेतकऱ्यांची केळी झाडे मोडून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.

पांगरी परिसरात काढणीस आलेली ज्वारी खाली कोसळून नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केळी बागायतदार अनिल चौधरी यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biogas Energy: ‘एलपीजी’वाले गॅसवर; बायोगॅस उभारणाऱ्यांना ‘नो टेन्शन’

Livestock Farming: पशुपालन उद्योजकतेस मिळणार चालना

Middle East Conflict: इराणच्या सर्वोच्च नेत्यांना लक्ष्य करण्याच्या रणनीतीचे विपरीत परिणाम

Agriculture Subsidy: कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी मिळणार ६० टक्के अनुदान

Sugar Production: देशातील साखर उत्पादनात ८६ टक्के वाटा तीन राज्यांचा

SCROLL FOR NEXT