Kobi Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

Chemically Mix Water : रासायनमिश्रित सांडपाण्यामुळे सिडको परिसरात पिकांची हानी

Water Pollution : अंबड गावातील शेतकरी अरुण भास्कर दातीर यांनी दोन एकर क्षेत्रावर कोबीची लागवड केली होती. रसायनयुक्त पाण्यामुळे त्यांच्या शेतातील कोबीचे अख्खे पीक जळाल्याने सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले.

Team Agrowon

Nashik Water News : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अंबड औद्योगिक वसाहतीत प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या शेकडो कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारत अनेक कंपन्या बंद केल्यानंतरही अनेक कंपन्यांमधील रासायनिक सांडपाणी आजही उघड्या नाल्यांत सोडले जात आहे.

याच प्रकारांतून स्थानिक शेतकरी शेतातील पिके जळत असल्याचा आरोप करत आहेत. काही शेतकऱ्यांनी तर पिकांचे नुकसान झाल्याने ऊभ्या पिकांवर ट्रॅक्टर फिरविला.

अंबड गावातील शेतकरी अरुण भास्कर दातीर यांनी दोन एकर क्षेत्रावर कोबीची लागवड केली होती. रसायनयुक्त पाण्यामुळे त्यांच्या शेतातील कोबीचे अख्खे पीक जळाल्याने सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले.

हे पीक काढणी करून मानवी आहारायोग्य नसल्याने त्यांनी हताश होऊन उभ्या पिकावर ट्रॅक्टरने नांगर फिरवला. गावातील नामदेव शिरसाट, विष्णू शंकर दातीर, नामदेव दातीर, शांताराम पडोळ, सुभाष शिरसाट, गोविंद शिरसाट, अशोक शिरसाट, संतु मोरे यांनीही असेच नुकसान झाल्याचा दावा केला.

हे शेतकरी पाणी व जमिनीचे परीक्षण करून, त्यानंतर महापालिका प्रशासनावर २०० कोटींच्या नुकसानभरपाईचा दावा दाखल करणार असल्याचे शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.

अंबड औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्या व्यावसायिक व औद्योगिक नियमांची पायमल्ली करत असून, प्रदूषण नियंत्रण मंडळही याकडे काणाडोळा करत आहे, तर काही अधिकारी आर्थिक देवाणघेवाण करीत उद्योजकांवर मेहेरनजर दाखवत असल्याचा आरोप केला जात आहे.

कारवाई का होत नाही

कंपन्यांमधील सांडपाणी थेट उघड्या नाल्यांत सोडले जात आहे. हेच पाणी परिसरातील १० किमी भागात झिरपते. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेल्या विहिरींमध्ये हे रसायनमिश्रित पाणी येते.

शेतकऱ्यांची शेती पिके या पाण्यामुळे जळून जात आहेत. प्रशासाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व शेतकऱ्यांनी केली आहे. अनेक वेळा आंदोलने करूनही या बाबीसंदर्भात कठोर पाऊल का उचलले जात नाही, असा प्रश्नही रहिवासी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT