Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : नाशिक जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसाने पिकांचे नुकसान

Post Monsoon Rain : यंदाचा शेतकऱ्यांना खरीप पिके व्यवस्थित घेता आली नाहीत. त्यामुळे कसेबसे हाती आलेले पीक आता सोंगणीच्या कामात शेतकरी व्यस्त होते.

Team Agrowon

Nashik News : यंदाचा शेतकऱ्यांना खरीप पिके व्यवस्थित घेता आली नाहीत. त्यामुळे कसेबसे हाती आलेले पीक आता सोंगणीच्या कामात शेतकरी व्यस्त होते. मात्र शुक्रवार (ता. २०) रोजी सायंकाळी पाच वाजेनंतर जिल्ह्याच्या विविध भागात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडवली.

प्रामुख्याने येवला, मालेगाव, चांदवड, निफाड तालुक्यात जोरदार सरी झाल्या. या मॉन्सूनोत्तर पावसाने नुकसान झाले. सोयाबीन, बाजरी, मका ही पिके पावसात भिजली तर मालेगाव तालुक्यातील अनेक शेवगा लागवडी आडव्या झाल्या आहेत. द्राक्ष बागाही अडचणींत येण्याची शक्यता आहे.

सायंकाळी पावसाचे अचानक वातावरण तयार होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार सरींना सुरुवात झाली. सोंगणी करून शेतात असलेली खरिपाची पिके झाकता न आल्याने ती पावसात भिजली आहेत. मका पावसात भिजल्याने चाऱ्याचे मोठे नुकसान आहे.

मालेगाव तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे सोयाबीन, मका व बाजरी ही पिके पावसात भिजली. तर वादळी वाऱ्यामुळे प्रमुख नगदी पीक शेवग्याच्या लागवडी या आडव्या झाल्या आहेत.

पाऊस नसल्याने यंदा शेवगा हंगाम लांबणीवर गेला होता. त्यातच या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. मालेगाव परिसर, करंजगव्हाण, वजीरखेडे, डाबली, काष्टी, वडगाव, लेंडाणे, सायने खुर्द परिसरात जोरदार वादळी पाऊस झाला. त्यामुळे फुलोरा अवस्थेत असलेल्या शेवगा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी मे, जून महिन्यात छाटण्या केल्या होत्या. x

आता ऐन माल येण्याच्या अवस्थेत पावसाने अडचणी वाढविल्या आहेत. यामध्ये फुलोरा व कोवळ्या शेंगांची गळ होण्याचा धोका आहे. अगोदरच पाऊसमान नसल्याने हंगाम लांबणीवर गेला आहे. त्यामुळे फुलकुज वाढण्याची शक्यता आहे. चांदवड तालुक्यातील धोडांबे महसूल मंडळात सर्वाधिक ५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

अचानक पावसाचे वातावरण तयार झाले. सायंकाळी अनेक शेतकऱ्यांना शेतातील सोंगणी केलेली सोयाबीन झाकून ठेवता आले नाही. त्यामुळे या पावसाच्या तडाख्यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. बाजरी, मका ही पिके पावसात सापडल्याने चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.

येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरिपातील सोयाबीन, बाजरी, मका ही पिके पावसात सापडली. तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. सध्या बागा फुलोरा अवस्थेत असताना गळकुज वाढल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. संवेदनशील अवस्थेत वागा असताना शेतकऱ्यांची फवारण्यांची लगबग वाढली आहे.

जिल्ह्यांत महसूल मंडळात झालेला पाऊस

महसूल मंडळ पाऊस(मिमी)

मालेगाव ३५

करंजगव्हाण १२.५

कौळाणे १.५

सौंदाणे ३.३

सायने १०.५

मुल्हेर २२.५

माडसांगावी २४.३

पेठ १४.८

करंजाळी १७.८

निफाड ७.५

पिंपळगाव बसवंत १४.३

लासलगाव १६.५

नायगाव १५.८

नगरसूल १३.५

पाटोदा २३.५

चांदवड १०.३

वडनेर १४.३

वादळी भोई १०.५

धोडांबे ५१.५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Heatwave: ‘वैशाख वणव्या’पूर्वीच होरपळ

Unseasonal Rain Relief GR: अवकाळीग्रस्त ९ जिल्ह्यांतील ६६ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ५३ कोटी ७३ लाख मदत मंजूर

Cotton, Soybean Rate: हळदीच्या भावात सुधारणा होण्याचे संकेत आहेत का ?

Village Development: गावच्या विकास निधीसाठी आता ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र अनिवार्य

Silk Production: ‘महारेशीम अभियाना’ला नांदेड जिल्ह्यात प्रतिसाद: वडवळे

SCROLL FOR NEXT