Chiku Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Chiku Disease : बुरशीजन्य रोगामुळे डहाणूत चिकूचे नुकसान

Chiku Crop Damage : अनियमित पाऊस आणि हवामान बदलामुळे चिकू पिकावर बुरशीजन्य रोगाचे सावट आले आहे.

Team Agrowon

Latest Agriculture News : अनियमित पाऊस आणि हवामान बदलामुळे चिकू पिकावर बुरशीजन्य रोगाचे सावट आले आहे. त्यामुळे डहाणू तालुक्यातील चिकू बागायतदारांचे नुकसान होत आहे.

सरकारने एकरी ४० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी चिकू बागायतदारांकडून करण्यात येत आहे.

पालघर जिल्ह्याच्या डहाणू, घोलवड भागात चिकूची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. चिकू बागायतदार आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याने फळाला जगभरात प्रसिद्धी मिळत आहे.

प्रक्रियायुक्त उद्योगांमध्ये चिकूची मोठ्या प्रमाणात आवक आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे फायटॉपथोरा पालमायरा या बुरशीची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

परिणामी फुलोरा गळणे, फळे काळी पडणे अशी लक्षणे दिसून येत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.

बुरशीजन्य आजारामुळे झाडावरील चिकूचे प्रमाण कमी झाले. परिणामी बाजारातील चिकूचे भाव वधारले आहेत. याचा फायदा व्यापाऱ्यांना होतो. मात्र शेतकरी हवालदिल झाला असून जिल्ह्यातील चिकू बागायतदारांना एकरी ४० हजार रुपयांची राज्य सरकारने मदत करावी.
- चंद्रकांत कोरे, चिकू बागायतदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT