Agriculture Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Damage : पारनेरमधील गोरेगावात बंधारा फुटल्याने शेतीचे नुकसान

Crop Damage : पावसामुळे पारनेर तालुक्यातील गोरेगाव परिसरातील बंधारा फुटला. पाणी शेतात घुसल्याने शेत पिकांचे नुकसान झाले आहे

Team Agrowon

Nagar News : पावसामुळे पारनेर तालुक्यातील गोरेगाव परिसरातील बंधारा फुटला. पाणी शेतात घुसल्याने शेत पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच अनेक भागात जोरदार पाऊस झाला. पारनेर तालुक्यातील सुपा, पळशी, वाडेगव्हाण, पारनेर, गोरेगाव, ढवळपुरी, भाळवणी आदी परिसरांमध्ये चार दिवसांपूर्वी पावसाने जोरदार बॅटिंग केली.

गोरेगाव परिसरातही जोरदार पाऊस झाला. या पावसाने परिसरातील ढवळदरा वस्तीवरील सर्वात वरचा बंधारा फुटून शेकडो एकर क्षेत्रावर नुकसान झाले आहे.

बंधाऱ्याखालील शेती व शेतामध्ये असलेले बाजरी, सोयाबीन, शेवंती व इतर पिके जमिनीस वाहून गेले आहेत.

बंधारा फुटल्याने बंधारा खालील शेती वाहून गेल्याने त्यात राजू नांगरे, रावसाहेब नांगरे, बाबासाहेब नांगरे, भाऊ नांगरे, दीपक नरसाळे, भास्कर नरसाळे यांसह इतर शेतकऱ्यांच्या पिकाचे तसेच शेती जमिनीचे नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT