Grape  Agrowon
ॲग्रो विशेष

Exportable Grape Damage : पावसाचा निर्यातक्षम द्राक्षाला फटका

गारपिटीमुळे द्राक्षमण्यांना तडे जाणे, द्राक्षघड तुटून खाली पडणे, द्राक्षमणी खाली पडणे, नवीन लागण केलेल्या बागांची पाने फाडली.

Team Agrowon

Satara News : कलेढोण परिसरातील रानमळा, शिंदेवाडी, बेलेवाडी व उंबरहोळ शनिवारी (ता. ८) सायंकाळी झालेल्या वादळी वारे, गारपिटीसह पावसामुळे निर्यातक्षम व स्थानिक बाजारपेठेसाठी तयार करण्यात आलेल्या द्राक्षपिकांचे मोठे नुकसान (Grape Damage) झाले.

या गारपिटीमुळे द्राक्षमण्यांना तडे जाणे, द्राक्षघड तुटून खाली पडणे, द्राक्षमणी खाली पडणे, नवीन लागण केलेल्या बागांची पाने फाडली. गारपिटीमुळे कलेढोण व विखळे भागात मोठे नुकसान झाले.

जिल्ह्यात द्राक्ष निर्यातीत आघाडीवर असणाऱ्या कलेढोण भागातील रानमळा, शिंदेवाडी, बेलेवाडी, उंबरहोळ भागात वादळी वारे, गारपिटीसह पावसामुळे निर्यातक्षम व स्थानिक बाजारपेठेसाठी तयार करण्यात आलेल्या द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले.

त्यात अब्दुल रजाक काझी यांचे २० गुंठे, रमेश ज्ञानदेव शिंदे ४० गुंठे, केशव शिंदे २ एकर, आप्पासो पांडुरंग जाधव ३० गुंठे, कविता अशोक जाधव ८० गुंठे, तुकाराम पांडुरंग जाधव ३० गुंठे, गुरुप्रसाद अशोक शिंदे यांचे चार एकर, अनिल नामदेव दबडे यांचे दोन एकर, दादासो विठोबा दबडे यांचे दोन एकर, आनंदा कृष्णा दबडे दोन एकर क्षेत्रांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी सहायक प्रवीण पाटील यांनी सांगितला.

यंदा द्राक्षबागांचे उत्पादनात वाढ झाल्याने दलाल व व्यापारांकडून द्राक्षांची निर्यात करण्यास कालावधी लागला. रात्री झालेल्या गारपिटीमध्ये काही शेतकऱ्यांच्या निर्यातक्षम द्राक्षाचे नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Policy Implementation: पतपुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण करा: जिल्हाधिकारी वर्षा मीना

Fruit Export Impact: निर्यातयोग्य फळ स्थानिक बाजारात आल्याने दरावर परिणाम

Women Agri Tools: महिलांसाठी कृषी अवजारे

Inspiration Story: कुबेराहून श्रीमंत असणारा गरीब

Ethanol Policy: इथेनॉलबाबत धोरणात्मक निर्णय आवश्यक

SCROLL FOR NEXT