Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : येवला, सिन्नरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

Rain News : जिल्ह्यात गुरुवारी (ता. ६) दुपारनंतर सिन्नर, येवला, इगतपुरी व नाशिक तालुक्यांत मॉन्सूनपूर्व पाऊस झाला.

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मॉन्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत आहे. मात्र हा पाऊस वादळी वाऱ्यासह पडत असल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा होत असला तरी अनेक ठिकाणी मोठे नुकसान होत असलेले समोर येत आहे.

जिल्ह्यात गुरुवारी (ता. ६) दुपारनंतर सिन्नर, येवला, इगतपुरी व नाशिक तालुक्यांत मॉन्सूनपूर्व पाऊस झाला. नाशिक व इगतपुरी तालुक्यांत तुलनेत सर्वाधिक पाऊस होता. देवळाली महसूल मंडळात ८४.५ मिमी पाऊस पडला असून येथे अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

येवला तालुक्यातील पाटोदा, सावरगाव, जळगाव या महसूल मंडलांत मध्यम ते हलक्या सरी बरसल्या. मात्र वादळी वाऱ्यासह पाऊस बरसल्याने विविध ठिकाणी नुकसान आहे. अंदरसुल महसूल मंडलात हलक्या स्वरूपाचा पाऊस होता.

वादळी वारा अधिक असल्याने अनकाई येथे शेतकऱ्याच्या सोलर प्लेट उडून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बोकटे येथे हलका पाऊस पडून वादळाने नुकसान केले आहे. येथे दोन नारळाच्या झाडांवर वीज कोसळली. या वेळी झाडांनी पेट घेतल्याचे पाहायला मिळाले.

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक पावसाचा तालुका असलेल्या इगतपुरीमध्ये शहर व परिसरासह पश्चिम पट्ट्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. भावली, मानवेढे, बोलीं, पिंपरीसदो, नांदगावसदो, कारवाडी, अवळखेड, चिंचलेखैरे, तसेच पूर्व भागासह घोटी भागात पाऊस झाला. त्यामुळे या भागात शेतीकामांना वेग येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात सांगवी येथेही शिवारात वादळी वाऱ्याने शेतकऱ्याच्या सौर ऊर्जा पॅनलच्या सौर प्लेटा दुपारी तीनच्या सुमारास उडाल्या. या घटनेत शेतकरी हिराबाई काळू घुमरे यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वाऱ्यामुळे सौर उर्जेच्या प्लेटा उडून गेल्या. त्यात काही प्लेटा शेतात तुटून पडल्या होत्या.

मंडलनिहाय पावसाची स्थिती

मंडल पाऊस (मिमी)

नवी बेज १०.८

देवळाली ८४.८

सातपूर १३.३

शिंदे २३.३

लखमापूर(दिंडोरी) ३

पाथर्डी १३.३

इगतपुरी २६.८

घोटी ३६.३

वाडी वऱ्हे १९.३

नांदगाव(इगतपुरी) ९.५

डुबेरे १५.३

सोनांबे १३.५

नांदूर ९.३

धोडांबे २६

पाटोदा ४.८

सावरगाव ३

जळगाव ४.८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT