Crop Damage
Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage In Parbhani : परभणी, हिंगोली जिल्ह्यात वादळी वारे, गारपिटीमुळे नुकसान

Team Agrowon

Parbhani Weather Update : परभणी जिल्ह्यातील अनेक मंडलांत मंगळवारी (ता. २५) दुपारी १ ते ३ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाला. अनेक मंडलांत मेघगर्जनेसह गारपीट (Halistorm) झाली.‌ केळी बागा मोडून पडल्या. आंबा, पपई, हळद, कांदा आदी पिकांना तडाखा बसला.

हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा, वारंगा फाटा, जवळा पांचाळ (ता. कळमनुरी) येथे वादळी वाऱ्यासह अर्धा ते पाऊण तास पाऊस झाला. काहीकाळ गारपीट झाली. वादळामुळे केळीची झाडे मोडून पडली. शेतात वाळवत घातलेली हळद भिजली. मोठे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. वसमत तालुक्यातील गिरगाव, हयातनगर मंडलांत पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील, पूर्णा, कावलगाव, ताडकळस, लिमला आदी मंडलांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही भागात गारपीट झाली. परभणी, गंगाखेड तालुक्यातील काही मंडलांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

गिरगाव येथे वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचे नुकसान

गिरगाव (ता. वसमत) भागात मंगळवारी (ता. २५) दुपारी दोनच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने झोडपले. यामुळे केळी पिकाचे नुकसान झाले.

गिरगावसह परजना, खाजमापूर वाडी, बोरगाव खुर्द, पार्डी बुद्रुक, डिग्रस खुर्द, मुंरुबा, माळवटा आदी भागांत दुपारी दोनच्या सुमारास जोरदार वारे वाहत होते. तसेच पाऊसही होता.

यामध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी, हळद पिकांचे मोठे नुकसान झाले असून गेल्या वर्षीही वादळी वाऱ्यासह पाऊस पडला होता. यामध्ये केळी पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते.

यावर्षीसुद्धा केळी, हळद पिकांचे नुकसान झाले असून सरकारने निवळ पंचनामे केले पण मदत काय मिळाली नाही. या वेळी तरी प्रशासनाने यांची दखल घेऊन शेतकऱ्यांना केळी पिकाचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

SCROLL FOR NEXT