Dairy Business Agrowon
ॲग्रो विशेष

Dairy Business : दुग्ध व्यवसाय पूरक नव्हे, मुख्य व्यवसाय म्हणून करा

केवळ योग्य व्यवस्थापनाअभावी आणि दुय्यम स्थान दिल्याने हा व्यवसाय मागे आहे. पण मुळात शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन केल्यास हा व्यवसाय चांगले पैसे मिळवून देतो.

Team Agrowon

Solapur News : दुग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक म्हणून नको, मुख्य व्यवसाय म्हणून केल्यास फायदेशीर आहे. त्यासाठी दुग्ध व्यवसायाचे (dairy business) शास्त्रोक्त ज्ञान घेऊन अधिकाधिक तरुण शेतकऱ्यांनी यामध्ये उतरावे, या व्यवसायात मोठी संधी आहे, असे मत जिल्ह्याचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. भास्कर पराडे यांनी व्यक्त केले.

खेड येथील कृषी विज्ञान केंद्राच्या (Agricultural Science Center In Khed) वतीने आयोजित आधुनिक दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप सत्रात डॉ. पराडे बोलत होते.

कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा कार्यक्रम समन्वयक डॉ. लालासाहेब तांबडे अध्यक्षस्थानी होते. सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. पी. डी. ढगे, विषय विशेषज्ञ डॉ. प्रकाश कदम उपस्थित होते.

डॉ. पराडे म्हणाले, की केवळ योग्य व्यवस्थापनाअभावी आणि दुय्यम स्थान दिल्याने हा व्यवसाय मागे आहे. पण मुळात शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन केल्यास हा व्यवसाय चांगले पैसे मिळवून देतो.

या व्यवसायात जनावरांची निवड, आदर्श गोठा, आहार व्यवस्थापन स्पर्धात्मक व्यावसायिकता या गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

प्रशिक्षणात शास्त्रोक्त माहिती

कृषी विज्ञान केंद्रामध्ये चार दिवसांचे हे प्रशिक्षण झाले. यामध्ये डॉ. प्रकाश कदम यांनी आदर्श गोठा, गाय-म्हशींच्या जाती व त्यांची वैशिष्ट्ये, आहार व्यवस्थापन व चारा उत्पादन, जनावरांच्या आरोग्याची योग्य काळजी, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती आदी विषयांवर शास्त्रोक्त माहिती दिली.

या प्रशिक्षणासाठी पाच तालुक्यांतील ५० हून अधिक तरुण शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT