Kukadi  Agrowon
ॲग्रो विशेष

Kukdi Irrigation : दहा दिवस आधीच सुटले कुकडीचे आवर्तन

Agriculture Irrigation : कर्जत-जामखेड तालुक्यांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या कुकडी धरणाचे आवर्तन मंगळवारी (ता. ५) सुटले. ५ डिसेंबरला सुटणारे आवर्तन दहा दिवस आधीच सुटल्याने शेतकऱ्यांत आनंद आहे.

Team Agrowon

Nagar News : आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यास यश आले असून, मंगळवारपासून (ता. ५) कुकडीचे आवर्तन सोडण्यात आले. १५ डिसेंबरला सुटणारे आवर्तन दहा दिवस आधीच सुटल्याने शेतकऱ्यांत आनंद आहे. आमदार रोहित पवार यांनी यासाठी पाठपुरावा केला.

कर्जत-जामखेड तालुक्यांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या कुकडी धरणाचे आवर्तन मंगळवारी (ता. ५) सुटले. आमदार पवार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने १५ डिसेंबरला सुटणारे आवर्तन १० दिवस अगोदरच सुटले. यंदा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत पाऊस झाला नसल्याने दुष्काळाचे सावट उभे ठाकले आहे. या आवर्तनाने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

आमदार पवार २० ऑक्टोबरला झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला उपस्थित होते. कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने कुकडीच्या पाण्याचे योग्य नियोजन करून लवकरात लवकर आवर्तन सोडावे,

अशी मागणी त्यांनी केली होती, तसेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत पाऊस न झाल्यास कुकडीचे १५ डिसेंबर रोजी सुटणारे आवर्तन १५ ते २० दिवस अगोदरच सोडावे, अशी विनंती केली होती. त्याप्रमाणे अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले होते.

कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित पवार यांना पत्र लिहून कुकडी प्रकल्पाचे रब्बी हंगामातील आवर्तन २५ नोव्हेंबरला सोडावे, अशी विनंती केली. त्याचबरोबर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतरही त्या अनुषंगाने वारंवार पाठपुरावा केला. आता १० दिवस अगोदरच कुकडीचे आवर्तन सोडले.
रोहित पवार, आमदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT