Chana Pest Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Pest : हरभरा पिकावर ‘कटवर्म’चा प्रादूर्भाव

Chana Crop : हरभऱ्याची उगवण होत असतानाच हरभऱ्याचे पाने, शेंडे विविध किडी कुरतडत आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी शेतकरी विविध प्रकारच्या किडनाशकांची फवारणी घेत आहेत.

Team Agrowon

Akola News : तालुक्यात रब्बी हंगामात लागवड होत असलेल्या हरभरा पिकावर उगवणीपासूनच संकटे घोंघावत चालली आहेत. हरभऱ्यावर कटवर्मचा प्रादूर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी उपाययोजना करण्यासाठी व्यग्र झाले आहेत.

या वर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेरणी झाली होती. सोयाबीनचा हंगाम यंदा तोट्याचा राहिला. त्यामुळे शेतकरी आता रब्बी हंगामावर अवलंबून आहेत. हरभऱ्याची पेरणी जोमाने सुरू आहे.

हरभऱ्याची उगवण होत असतानाच हरभऱ्याचे पाने, शेंडे विविध किडी कुरतडत आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी शेतकरी विविध प्रकारच्या किडनाशकांची फवारणी घेत आहेत.

शेतकऱ्यांनी तालुक्यात खारपाण पट्ट्यात पाथर्डी, राणेगाव, भोकर, सिरसोली, पंचगव्हाण, खाकटा, नेर, आडसूळ, सांगवी, पिवदंळ, बाभूळगाव याभागांत शेतांमध्ये ओल मोठ्या प्रमाणात असल्याने पेरणी होत आहे.

तर हिवरखेड, बेलखेड, माळेगाव, तळेगाव, तळेगाव खुर्द, गोर्धा, हिंगणी, आकोली, काळेगाव या भागांत सिंचनाची सोय असल्याने शेतकरी हरभऱ्याच्या लागवडीला लागलेले आहेत.

काही ठिकाणी शेतकरी कपाशीचे पीकही काढून पेरणीची तयारी करू लागले आहेत. पेरणी केलेला हरभरा उगवू लागला आहे. त्यातच उगवणीनंतर लगेच विविध प्रकारचे किडे पिकाचे नुकसान करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

Poultry Processing By Products: कुक्कुट प्रक्रिया उद्योगातील उप-उत्पादनांपासून मूल्यवर्धन

Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी

SCROLL FOR NEXT