ॲग्रो विशेष

Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड सुरू

Watermelon Farming : खानदेशात कलिंगडाची लागवड सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी या महिन्याच्या मध्यात लागवड केली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात कलिंगडाची लागवड सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी या महिन्याच्या मध्यात लागवड केली आहे. यंदा नंदुरबारात लागवड कमी झाल्याची माहिती असून, खानदेशातील एकूण क्षेत्र मात्र फारसे कमी होणार नाही, असे चित्र आहे.

खानदेशात रब्बीमधील कलिंगडाची लागवड अधिक केली जाते. जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुका कलिंगड लागवडीत आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ चोपडा, यावल, मुक्ताईनगर भागात कलिंगडाची लागवड केली जाते. कलिंगडास अखेरच्या १५ ते २० दिवसांत अधिकचे पाणी सिंचनासाठी लागते. रोज पाच ते सहा तास सिंचन करावे लागते.

यामुळे कमी पाऊसमान असलेल्या भागात कलिंगडाची लागवड यंदा कमी झाली आहे. परंतु चोपडा, यावल भागात लागवड वाढली आहे. जामनेरातील लागवडही स्थिर आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील क्षेत्रात मोठी घट किंवा मोठी वाढही झालेली नाही. धुळ्यात धुळे, शिरपूर भागांत काही शेतकरी लागवड करतात. धुळ्यातही क्षेत्रात मोठी घट किंवा वाढ झालेली नाही. जळगाव व धुळ्यात मिळून सुमारे ६०० हेक्टरवर कलिंगडाचे पीक आहे.

नंदुरबारात मागील हंगामात सुमारे २५० हेक्टरवर कलिंगडाची लागवड झाली होती. परंतु यंदा तेथील लागवड सुमारे १५० हेक्टरने कमी झाली आहे. खानदेशातील एकूण क्षेत्र मागील हंगामात सुमारे ७०० हेक्टर एवढे होते. यंदा हे क्षेत्र ७०० हेक्टरवरच स्थिर आहे.

मागील हंगामात डिसेंबरमध्ये कलिंगडाचे नुकसान विषम वातावरणासह विविध रोगांमुळे झाले होते. त्यात शेतकऱ्यांनी ६० ते ७० हजार रुपये खर्च केला होता. हा खर्चही अनेकांचा वाया गेला होता. कलिंगडाचे पीक नाजूक व अधिक श्रमाचे आहे. त्यात दैनंदिन विद्राव्य खते, आवश्यकतेनुसार एक दिवसाआड फवारणी घ्यावी लागते.

यामुळे मोठे बागायतदार शेतकरी कलिंगड पिकापासून दूर आहेत. लहान, मध्यम शेतकऱ्यांनी आपल्याकडील जलसाठ्याच्या उपलब्धतेनुसार कलिंगडाची लागवड केली आहे. शेतकऱ्यांनी कलिंगड बियाणे खरेदी करून त्यापासून रोपवाटिकांमध्ये रोपे तयार करून घेतली आहेत. एका रोपासाठी ७० पैसे खर्च आला यात आला आहे.

तर अनेकांनी अडीच रुपये प्रतिरोप या दरात रोपवाटिकांतून रोपांची खरेदी केली आहे. कलिंगडाची रोपे निर्मिती फारशी शेतकरी करून घेत नसल्याने रोपवाटिकांच्या उलाढालीवरही यंदा काहीसा परिणाम झाल्याची माहिती मिळाली.

मजुरांची समस्या

कलिंगड लागवडीसंबंधी देखील खानदेशात मजूरटंचाई जाणवत आहे. अनेक लहान शेतकरी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने लागवड उरकून घेत आहेत. एक दिवसात एका कुटुंबातील तीन सदस्य पाऊण एकरात पाच बाय दीड फूट अंतरातील लागवड पूर्ण करून घेत आहेत. कलिंगड लागवडदेखील किचकट, वेळखाऊ व अधिक श्रमाची प्रक्रिया आहे. यामुळे मजूर कलिंगड लागवडीसाठी येत नाहीत किंवा अधिकची मजुरी मागतात. यामुळे शेतकऱ्यांना कुटुंबीयांच्या मदतीने ही कार्यवाही करून घ्यावी लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT