Millet Crop Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Millet Cultivation : ‘लघू तृणधान्यवर्गीय पिकांची लागवड करा’

तृणधान्य पिकांची वाढ कोरडवाहू जमिनीसह पर्जन्यवृष्टी असलेल्या परिस्थितीत सुद्धा होते. अगदी निकृष्ट दर्जाच्या मातीतही तृणधान्य घेता येतात.

Team Agrowon

Buldana Millet News : भारतीय कृषी संस्कृतीचा (Indian Agriculture) अनिवार्य घटक असलेल्या तृणधान्याला (Millet Crop) जागतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लघू तृणधान्य पिकांच्या लागवडीसाठी (Millet Cultivation) पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले.

संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. भारताने यासंबंधीचा ठराव मांडला होता.

यापूर्वीदेखील कृषी शास्त्रज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांनी तृणधान्याला पौष्टिक धान्य संबोधून अन्नधान्य सुरक्षा कायद्यामध्ये तृणधान्याचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे.

देशात नाचणी, ज्वारी, बाजरी ही मुख्य तृणधान्य उत्पादित होतात. या पिकांमध्ये सर्व प्रकारचे पौष्टिक गुणधर्म, खनिजे, जीवनसत्वे संतुलित आणि जास्त प्रमाणात आहेत. कमी ग्लायसेमिक इंडेक्स, उच्च कॅल्शियम, लोह, प्रथिने तसेच फायबर जास्त प्रमाणात असतात.

तृणधान्य पिकांची वाढ कोरडवाहू जमिनीसह पर्जन्यवृष्टी असलेल्या परिस्थितीत सुद्धा होते. अगदी निकृष्ट दर्जाच्या मातीतही तृणधान्य घेता येतात. वातावरणात कार्बनडाय ऑक्साइड उत्सर्जित करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

आयसीएआर संस्थेने तृणधान्य क्षेत्रातील संशोधनामध्ये विस्तृत काम केले आहे. संस्थेने अधिक उत्पन्न देणाऱ्या तृणधान्य वाणाचे मागील वर्षात देशाच्या विविध भागात वाटप केले आहे.

लघु तृणधान्य पिकांमधील नाचणी, राळा, कुटकी, वरई, सावा, भगर, कोद्रा, कोदोमध्ये प्रथिने, चरबीयुक्त पदार्थ, पिष्टमय पदार्थ, तंतुमय पदार्थ, ऊर्जा विपुल प्रमाणात असल्याने ही लघू तृणधान्य पिके घ्यावीत, असेही डाबरे यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT