Seed Selling Update Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Selling Update : कोल्हापुरात पावसाच्या सरींमुळे बियाणे खरेदीसाठी गर्दी

Kolhapur Seed Update : तब्बल एक महिना उशिराने आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी अजूनही पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. मात्र याच दिलाशावर कृषी सेवा केंद्राकडे शेतकरी बियाणे खरेदीसाठी येत आहेत.

Team Agrowon

Kolhapur News : तब्बल एक महिना उशिराने आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी अजूनही पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. मात्र याच दिलाशावर कृषी सेवा केंद्राकडे शेतकरी बियाणे खरेदीसाठी येत आहेत.

मृगाचा व रोहिणीचा पेरा साधण्यासाठी शेतकऱ्यांनी शेती सज्ज ठेवली होती. परंतु पाऊस लांबतच गेला. वेळेत मॉन्सून येण्याच्या शक्यतेने कृषी सेवा केंद्रांनीही आधीच बियाणे, खते, औषधांचा साठा केला होता.

मात्र पावसला उशीर होऊ लागल्याने या केंद्रांकडेही शेतकरी फिरकले नाहीत. तब्बल महिनाभर उशिराने शनिवारपासून (ता. २४) पावसाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी तुरळक पाऊस झाला. रविवारी (ता. २५) अधूनमधून जोरदार सरी‍ कोसळल्या.

पावसाचे आगमन झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्‍यांची पेरणीची धांदल सुरू झाली आहे. बियाणे, खते खरेदीसाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रांकडे येत आहेत. रांगा लावून बियाणे खरेदी करीत आहेत. रविवारी (ता. २५) आठवडा बाजारादिवशी सर्वच शेती सेवा केंद्रांत शेतकऱ्‍यांची गर्दी पहायला मिळाली.

विशेष करून भात आणि सोयाबीन बियाण्यांची खरेदी सुरू होती. विविध जातींसह कमी कालावधीचे बियाणे खरेदीकडे शेतकऱ्‍यांचा कल होता. पेरणीसाठी लागणाऱ्‍या खतांनाही मागणी वाढली. शेतकऱ्‍यांनी बियाणे, खते नेण्यासाठी खास वाहने आणली होती.

दरम्यान, मे अखेर आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या धूळवाफ पेरण्यांना हा पाऊस दिलासादायक असला तरी अद्याप अपेक्षित ओल जमिनीत नाही. यामुळे शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. काही ठिकाणी कमी तर काही भागात अधिक पाऊस होत आहे.

सरसकट पाऊस नसल्यानेही शेतकरी चिंतेत आहे. विशेष करून महागावच्या पश्‍चिमेकडील नेसरी भागात भात रोप लावणीवर भर दिला जातो. जुलैच्या मोठ्या पावसात ही रोपलावणी होते. यावर्षी जूनमध्ये पाऊसच नसल्याने भात रोपनिर्मिती शेतकऱ्‍यांसमोर आव्हानात्मक ठरली.

घागरीने पाणी आणून शेतकऱ्‍यांनी रोपे जगवली. या रोपांनाही पाऊस नसल्याने त्याच्या वाढीवर परिणाम झाल्याचे शेतकऱ्‍यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT