Banana Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Crop Compensation : केळीचे कोट्यवधींचे नुकसान; पण भरपाईच नाही

Heavy Rainfall Damage : काही भागात २०१९ मधील नुकसानीच्या भरपाईची प्रतीक्षा आहे. तर काही भागात २०२०, २०२१ मध्ये झालेल्या नुकसानीच्या भरपाईची किंवा मदतनिधीची मागणी आहे.

Team Agrowon

Jalgaon News : ः जिल्ह्यात गेल्या दोन - तीन वर्षात विविध महिन्यांत वादळ, गारपिटीत केळीची कोट्यवधींची हानी झाली आहे. परंतु शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत असून, पंचनामे व अहवालांचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

काही भागात २०१९ मधील नुकसानीच्या भरपाईची प्रतीक्षा आहे. तर काही भागात २०२०, २०२१ मध्ये झालेल्या नुकसानीच्या भरपाईची किंवा मदतनिधीची मागणी आहे. मागील वर्षीही मार्च ते जून या कालावधीत पावसासोबत आलेल्या वादळात जळगाव, रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर या तालुक्यांमधील सुमारे तीन हजार हेक्टरवरील केळी पिकाची हानी झाली आहे. त्यात केळीच्या तत्कालीन दरांनुसार सुमारे सात ते साडेसात कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

जळगाव, रावेर, मुक्ताईनगर, यावल भागात केळी काढणीच्या अवस्थेत होती. तसेच अनेकांची केळी निसवली होती. त्यात काढणी सुरू होण्याची स्थिती होती. चोपडा भागातही केळीची जोमात वाढ झाली होती. परंतु मार्च ते जून या यादरम्यान या भागाला वादळी पावसाचा मोठा फटका बसला. २०२३ मध्येही गारपीट झाली होती. भागात तर सलग तीन दिवस वादळी पाऊस झाला. त्यात केळी भुईसपाट होऊन तिचे ३० ते ८० टक्के नुकसान झाले.

प्रशासनालाही सलग तीन दिवस पंचनामे करावे लागले. यात नुकसानीची आकडेवारी, क्षेत्र वाढत गेले. केळी पिकांसह घरे, चाऱ्याचेही नुकसान अनेक भागात झाले आहे. केळीला एकरी किमान ६० हजार ते एक लाख रुपये खर्च येतो. काही शेतकरी एकरी सव्वा लाख रुपये खर्च करतात.

हा खर्च वाढत आहे. यामुळे हेक्टरी पाच लाख रुपये भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. नुकसानग्रस्त भागाची पाहणी त्या वेळी अधिकारी, लोकप्रतिनिधींनी केली. परंतु पाहणी दौऱ्यांचा सपाटा जसा लावला. तशी नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई मिळावी, यासाठी काम झाले नाही. शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Return : मॉन्सूनची महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार

Seasonal Paisewari: छत्रपती संभाजीनगर, जालन्याची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

SCROLL FOR NEXT