Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : यावल तालुक्यात शेकडो हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका

Unseasonal Rain : यावल तालुक्यात शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे यावल शहर व तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील केळी, गहू, मका आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Akola News : यावल तालुक्यात शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे यावल शहर व तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील केळी, गहू, मका आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापणी योग्य केळी ही जमीनदोस्त झाली आहे.

तसेच शेतातील मोठमोठे वृक्ष कोलमडले आहेत. या अवकाळी पावसाचा यावल तालुक्याच्या पश्चिम भागाला सर्वांत जास्त फटका बसल्याचे शनिवारी प्राथमिक पाहणी यांची दिसून आले आहे. तर महसूल विभागाला चोपडा आमदार लता सोनवणे यांनी तातडीने पाहणी करून पंचनामाच्या सूचना केल्या आहेत.

तहसीलदारांच्या माध्यमातून तलाठी मंडळ अधिकाऱ्यांच्या वतीने प्रारंभिक पाहणी करून नुकसानीचा प्राथमिक पंचनामा केला जात आहे.

तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी जोरदार वादळासह गारपीट झाली. या वादळी पावसामुळे यावल तालुक्यातील पश्चिम भागाला मोठा फटका बसला आहे. यावल शहरालगत तसेच साकळी, दहिगाव, मोहराळा, हरिपुरा, चुंचाळे, बोराळे, थोरगव्हाण, विरोदा, पिळोदा, पथराडे, नायगावसह अनेक भागांमध्ये शेतातील केळी पीक, गहू, मका सह आदी पीक जमीनदोस्त झालेले दिसून आले आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका यावल तालुक्यातील पश्चिम भागाला बसला आहे.

उघड्यावरील कांदा ओलाचिंब

सावखेडासिम, कोरपावली, महलखेडी, विरावली परिसरात सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. १३) रात्री पुन्हा अवकाळी पावसाने जोरदार झोडपले. यात उघड्यावर पडलेला कांदा, मका पाण्याने ओले चिंब झाले तर केळी आडवी पडली. मका पीक जमीनदोस्त झाले. केळीचे खोड उन्मळून पडले. अनेक झाडे पत्रे उडाली.

याबाबत तलाठी व महसूल विभागाने कृषी विभागाने त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांकडून होत आहे. आधीच कर्जबाजारी शेतकरी झाला आहे आणि या अवकाळी पावसाने पुन्हा शेतकऱ्यांना नुकसानाच्या डोहात ढकलण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे शेतकरी वैतागला आहे. या प्रकाराकडे शासनाने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT