Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसामुळे पुणे विभागातील ६३ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

Unseasonal Rain : गेल्या आठवड्यात पुणे विभागात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेली शेती पिके, फळपिके तसेच शेतजमिनीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News
: पुणे : गेल्या आठवड्यात पुणे विभागात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेली शेती पिके, फळपिके तसेच शेतजमिनीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

विभागात एकूण ६२ हजार ७८९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून, हे मोठे नुकसान झाले असल्याचे नजर अंदाजाच्या अहवालावरून समोर आले आहे.

पुणे विभागातील पिकांच्या नुकसानीबाबतची माहिती नजर अंदाजाद्वारे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने घेतली असून, त्यावरून नगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील पिकांच्या नुकसानीची माहिती पुढे आली आहे.

नैसर्गिक आपत्तीमध्ये जिरायत क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असले तरी बागायती क्षेत्रावरील पिके आणि फळपिकांचे, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. जिरायत पिकांना हेक्टरी ६५०० रुपये, तर बागायती पिकांना हेक्टरी १३ हजार ५०० रुपये, तर फळपिकांना हेक्टरी १८ हजार रुपयांच्या नुकसानीचे सानुग्रह अनुदान देण्यात येते.

नजर अंदाजाद्वारे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. संबंधित तहसीलदारांनी नुकसान झालेल्या काही ठिकाणी पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून कृषी व महसूल विभागाच्या संयुक्तपणे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.


पुणे जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे नजरअंदाजे ११ हजार २२७ हेक्टर क्षेत्रातील भात, कांदा व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. तर नगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे २१ हजार ७८७.४४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीचा प्राथमिक अहवालावरून दिसून येते. सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर २९, ७७५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

पुणे विभागात एकूण ६२ हजार ७८९.४४ एवढ्या क्षेत्रावर नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्त पिकांमध्ये खरीप, रब्बी, भाजीपाला व फळपिकांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातही रब्बी पिकांचे व फळपिकांचे नुकसान झालेले आहे. परंतु माहिती अधिकृत पुढे आली नसल्याने येथील क्षेत्रातही काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे.

यामध्ये गहू, मका, हरभरा, कांदा, ज्वारी, द्राक्षे, डाळिंब पिकांचे नुकसान झाले. विभागात सर्वाधिक नुकसान कांदा, गहू, हरभरा, आंबा या पिकांचे झाले आहे. याशिवाय भाजीपाला, फळपिके, कलिंगडे, फूलपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

Farm Equipment: मुरुडमध्ये अल्पभूधारकांना कृषी अवजारांचे वाटप

Ahilyanagar Agro Tourism : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटनाची निर्मिती करा

Research Paper Award: श्रीशैल्य हेगान्ना यांना रिसर्च अवॉर्ड

SCROLL FOR NEXT