Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Survey : खानदेशात पीकहानीचे पंचनामे अपूर्णच ; शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष

Crop Insurance : खानदेशात केळीसह अन्य पिकांची मोठी हानी मागील आठवड्यातील गारपीट, पावसात झाली आहे. शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारी केल्या. परंतु पंचनामे अपूर्णच आहेत. अनेक भागात महसुली कर्मचारी व विमा कंपनीचे प्रतिनिधी पोचलेच नाहीत.

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव ः खानदेशात केळीसह अन्य पिकांची मोठी हानी मागील आठवड्यातील गारपीट, पावसात झाली आहे. शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारी केल्या. परंतु पंचनामे अपूर्णच आहेत. अनेक भागात महसुली कर्मचारी व विमा कंपनीचे प्रतिनिधी पोचलेच नाहीत. यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे. विमा कंपनीकडे नुकसान झाल्यानंतर ७२ तासात ऑनलाइन तक्रार अनेक शेतकऱ्यांनी नोंदविली आहे.

सुमारे पाच हजार ऑनलाइन तक्रारी जळगाव, धुळे जिल्ह्यातून दाखल झाल्या आहेत. परंतु या तक्रारींची अंतिम कार्यवाही पाहणी, पंचनामे केल्यानंतर होते. ती पूर्ण झालेली नाही. काही भागात विमा कंपनी प्रतिनिधींसोबत महसुली व कृषी विभागाचे कर्मचारी येत नाहीत. तर काही भागात महसुली कर्मचारी येतात, पण विमा कंपनीचे कर्मचारी येत नाहीत.

फळ पीकविमा योजनेतून केळी विमाधारकांना वादळ,गारपीट किंवा वेगाच्या वाऱ्याने झालेल्या नुकसानीसंबंधी परतावे दिले जातात. त्यासाठी वादळ, वेगाचा वारा आल्यानंतर ७२ तासात तक्रार विमा कंपनीकडे नोंदवायची असते. अनेक शेतकऱ्यांना ही तक्रार नोंदविताना तांत्रिक किंवा नेटवर्क व अन्य अडचणी आल्या. काही शेतकऱ्यांना मोबाईल हाताळता येत नसल्याने तक्रार नोंदविता आलेली नसल्याचीदेखील माहिती आहे.

केळीच्या नुकसानीसंबंधी यावल, रावेर, चोपडा, जळगाव भागातून विमा कंपनीकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. सुमारे साडेचार हजारांवर तक्रारी दाखल आहेत. परंतु त्यावर तत्काळ कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिला दिला जावा, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. महसूल प्रशासनाने अनेक गावांत नुकसानच नाही.

वादळच नव्हते, अशी भूमिका घेऊन संबंधित गावात पाहणीच केलेली नाही. यामुळेदेखील अडचण येत आहे. खानदेशात वादळात केळीचे सुमारे तीन ते साडेतीन हजार हेक्टरवर नुकसान झाले आहे. यामुळे मोठा वित्तीय फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT