Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan: तेहतीस हजारांवर शेतकऱ्यांना ३४२ कोटींचे पीककर्ज वाटप

Farm Loan: खरीप हंगामामध्ये मे अखेरपर्यंत परभणी जिल्ह्यातील बँकांनी २० हजार ३०६ शेतकऱ्यांना २२७ कोटी ७३ लाख रुपये (१४.४० टक्के) पीककर्ज वाटप केले आहे.

Team Agrowon

Parbhani News: खरीप हंगामामध्ये मे अखेरपर्यंत परभणी जिल्ह्यातील बँकांनी २० हजार ३०६ शेतकऱ्यांना २२७ कोटी ७३ लाख रुपये (१४.४० टक्के) पीककर्ज वाटप केले आहे. हिंगोली जिल्ह्यातील बँकांनी १३ हजार ५९८ शेतकऱ्यांना ११४ कोटी ३३ लाख ३६ हजार रुपये (१३.०५ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे.

या दोन्ही जिल्ह्यांत मिळून एकूण ३३ हजार ९०४ शेतकऱ्यांना ३४२ कोटी ६ लाख ३६ हजार रुपये पीककर्ज वितरित करण्यात आले. पीककर्ज वाटपात महाराष्ट्र ग्रामीण बँक आघाडीवर असून त्यानंतर जिल्हा सहकारी बँकेचा क्रम आहे. मात्र व्यापारी (राष्ट्रय) बँका पिछाडीवर आहेत.

परभणी जिल्ह्यात खरीप २०२४ मधील १ हजार ४७० कोटी ९७ लाख रुपये उद्दिष्टाच्या तुलनेत ११० कोटी ६३ लाख रुपये वाढ करून या वर्षी बँकांना पीककर्ज वाटपाचे १ हजार ५८१ कोटी ६० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गतवर्षीच्या (२०२४) तुलनेत यंदा राष्ट्रीय बँकांचे उद्दिष्ट १३४ कोटी ५२ लाख रुपयांनी तर खासगी बँकांचे उद्दिष्ट ५ कोटी ७४ लाख रुपयांनी कमी करण्यात आले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उद्दिष्टात १३९ कोटी १५ लाख रुपये तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या उद्दिष्टात १११ कोटी ७४ लाख रुपये वाढ करण्यात आली. शनिवारअखेर (ता. ३१) राष्ट्रीय (व्यापारी) बँकांनी ६ हजार १६५ शेतकऱ्यांना ७८ कोटी ७५ लाख रुपये,

महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १० हजार ६८० शेतकऱ्यांना १२४ कोटी १७ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २ हजार ९०९ शेतकऱ्यांना १४ कोटी ९१ लाख रुपये पीककर्ज वाटप केले. गतवर्षी (२०२४) मे अखेरपर्यंत १७ हजार ९९१ शेतकऱ्यांना १७८ कोटी ३२ लाख रुपये (१२.१२ टक्के) पीककर्ज वाटप झाले होते.

हिंगोलीत ८७५ कोटी ९० लाख रुपये उद्दिष्ट

हिंगोली जिल्ह्यात खरीप २०२४ मधील ८९१ कोटी ७७ लाख रुपये उद्दिष्टाच्या तुलनेत १५ कोटी ८७ लाख रुपये कमी करून यंदा खरीप पीककर्ज वाटपाचे ८७५ कोटी ९० लाख रुपये उद्दिष्ट देण्यात आले आहे. व्यापारी बँकांचे उद्दिष्ट ३७ कोटी ९१ लाख रुपयांनी कमी करण्यात आले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उद्दिष्टात १७ कोटी २२ लाख रुपयांनी तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या उद्दिष्टात ४ कोटी ८२ लाख रुपयांनी वाढ करण्यात आली. सोमवारअखेर (ता. ९) जिल्ह्यातील बँकांनी १३ हजार ५९८ शेतकऱ्यांना ११४ कोटी ३३ लाख ३६ हजार रुपये पीककर्ज वाटप केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT