Nandurbar Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : शेतकऱ्यांना शून्य टक्का व्याजाने पीककर्ज

Nandurbar District Co-operative Bank : खरीप हंगामासाठी धुळे-नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेतर्फे पीककर्जात शेतकऱ्यांना शून्य टक्का व्याज दराची सवलत दिली जाणार आहे.

Team Agrowon

Dhule News : खरीप हंगामासाठी धुळे-नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेतर्फे पीककर्जात शेतकऱ्यांना शून्य टक्का व्याज दराची सवलत दिली जाणार आहे. दोन्ही जिल्ह्यांतील लाखावर शेतकऱ्यांना १० एप्रिलपासून हा लाभ दिला जाणार आहे.

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०२४- २०२५ या कालावधीत नवीन पीककर्ज वाटपाची मंजुरी घेत वाटपाच्या तयारीला वेग दिला आहे. तसेच ३० मार्च २०२४ पूर्वी पीककर्ज परतफेडीचे आवाहन बँकेने केले आहे.

दोन्ही जिल्ह्यांतील प्राथमिक विविध कार्यकारी, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सभासदांना, बँकेमार्फत वैयक्तिक पीक कर्ज घेणाऱ्या सर्व सभासद, सर्वसामान्य सभासदांना बँकेतर्फे नवीन पीककर्जाबाबत माहिती दिली जात आहे.

यात येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाने पीककर्जावर शून्य टक्का दराने व्याज सवलत देण्याचे निश्‍चित केले आहे. तसेच दहा एप्रिलपासून नवीन पीककर्ज वाटप करण्याविषयी धोरणात्मक निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

कर्ज भरणाचे आवाहन

राज्य शासनाने घोषित केल्याप्रमाणे तीन लाखांपर्यंतचे कर्ज वितरित होणार आहे. ‘प्रथम कर्ज भरणा, प्रथम नवीन कर्ज प्राप्ती’ या धोरणानुसार कर्ज वाटप होणार आहे. ३० मार्चपर्यंत भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना (थकित अधिक चालू) दहा एप्रिलपासून पीककर्ज वाटप होणार आहे. संपूर्ण कर्जवाटप नवीन पर्सनलाइज्ड एटीएम डेबिट कार्डद्वारे कर्ज वितरण होणार आहे.

कर्जदार शेतकरी सभासदांनी ३० मार्चपर्यंत मागील वर्षाच्या पीककर्जाची परतफेड ही बँक धोरणाप्रमाणे फक्त घेतलेल्या मुद्दल रकमेची तत्काळ परतफेड करावी, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, उपाध्यक्ष दीपक पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, सरव्यवस्थापक ए. एम. सिसोदे यांनी केले.

मंजूर दरानुसार वाटप

धुळे आणि नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय तांत्रिक समितीची सभा झाली. तीत पीककर्ज दरास मंजुरी देण्यात आली. यामध्ये प्रति हेक्टरी स्केल : कापसाला ८० हजार, केळीला १ लाख २६ हजार, पपईला १ लाख २० हजार.

नाबार्डच्या धोरणाप्रमाणे बँक पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मच्छीमारीसाठीच्या नवीन पर्सनलाइज्ड एटीएम डेबिट कार्डद्वारे जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने निश्‍चित केलेल्या पीककर्ज दरानुसार कर्जवाटप करणार आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या निर्णयानुसार बँक कृषिपूरक उद्योगासाठी वैयक्तीक व सहकारी संस्थांमार्फत २०२४- २०२५ च्या पीककर्ज वाटप रक्कमेच्या ७५ टक्के रक्कम कन्झम्शन कर्ज म्हणून देण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT