Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविम्याचे नुकसान भरपाईचे पैसे विमा कंपनीने त्वरित द्यावेत

Crop Damage Compensation : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने प्रधानमंत्री पीकविमा योजना २०२३ अंतर्गत वैयक्तिक अर्ज (इंटीमेशन) भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.

Team Agrowon

Solapur News : प्रधानमंत्री पीकविमा योजना २०२३ अंतर्गत वैयक्तिक अर्ज (इंटीमेशन) भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख १३ हजार ५६३ इतकी असून या अंतर्गत पीक विम्यासाठी पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम त्वरित अदा करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित प्रधानमंत्री पीकविमा योजना जिल्हास्तरीय आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी राहुल गायकवाड, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी तसेच पूर्वीचे भारतीय कृषी विमा कंपनीचे प्रतिनिधी बाळासाहेब गोपाळ व अन्य सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, की ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने प्रधानमंत्री पीकविमा योजना २०२३ अंतर्गत वैयक्तिक अर्ज (इंटीमेशन) भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. यापैकी २५ हजार ७१ शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम आदा झालेली आहे. तरी उर्वरित शेतकऱ्यांची रक्कम शासन निर्णयात नमूद तरतुदीच्या अधीन राहून जेवढ्या शेतकऱ्यांचे शक्य आहेत त्या सर्व पात्र शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे त्वरित देण्याबाबतची कार्यवाही करावी.

विमा कंपनीने बऱ्याच ठिकाणी पीक नुकसानीचा पंचनामा न करता शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई चे पैसे नाकारलेले आहेत हे चुकीचे असून विमा कंपनीने नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असे त्यांनी निर्देशित केले. कृषी विभागाने पीकविमा कंपनीच्या अहवालाची व्यवस्थित माहिती घेऊन आजच्या बैठकीचा संदर्भ देऊन ज्या शेतकऱ्यांना या अंतर्गत नुकसान भरपाई मिळू शकते त्या सर्वांना नुकसान भरपाई मिळण्याबाबतचा अहवाल विमा कंपनीला पाठवावा व विमा कंपनीने त्यांच्या स्तरावरून याबाबत पुढील कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल यासाठी सकारात्मक रहावे असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सूचित केले.

१३ हजार शेतकरी वंचित

प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम २०२३ नुकसान भरपाईची सद्यःस्थिती बैठकीत मांडली. यामध्ये हंगाम मध्य प्रतिकूल परिस्थिती नुकसान भरपाई वाटप हे जिल्ह्यातील १ लाख ९२ हजार ७५० शेतकऱ्यांना ११५ कोटी झालेले असून, १३ हजार ५३३ शेतकऱ्यांना ९३ लाख रुपये मिळणे बाकी असल्याचे सांगितले. तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती वैयक्तिक पंचनामे आधारित नुकसान भरपाई २५ हजार ९५४ शेतकऱ्यांची झालेली होती यानुसार २४ हजार ७७२ शेतकऱ्यांना २४ कोटी ३३ लाखाचे वाटप झाले, अशी माहिती त्यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT