Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीक नुकसानीपोटी हरियाणा सरकारची शेतकऱ्यांना ३१ कोटींची विमा भरपाई

Crop Damage Compensation : अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे झालेल्या पीक नुकसानीपोटी हरियाणा सरकारने शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई जाहीर केली आहे.

Mahesh Gaikwad

Pune News : अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे झालेल्या पीक नुकसानीपोटी हरियाणा सरकारने शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई जाहीर केली आहे. राज्य सरकाच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

यामुळे चालू हंगामातील गहू, मोहरी आणि इतर पिकांसाठी लागणाऱ्या खते आणि किटकनाशकांच्या फवारणीसाठी पैसे उपलब्ध होणार आहेत. राज्याचे कृषीमंत्री जे.पी.दलाल यांनी 'एक्स'वर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे.

गेल्या वर्षी फेब्रूवारी-मार्च २०२३ मध्ये अवकाळी पावसामुळे गहू, मोहरीसह हजारो हेक्टरवरील रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. गारपीटमुळे हजारो हेक्टरवरील गव्हाचे पीक संपूर्णत: भूईसपाट झाले होते. यासंदर्भात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे भरपाईची मागणी केली होती.

हरियाणा सरकारने नविन वर्षाच्या सुरूवातीलाच विमा भरपाई म्हणून ३१ कोटी रुपये जाहीर केले आहेत. यामुळे राज्यातील ७ जिल्ह्यातील सुमारे २९ हजार ४३८ शेतकऱ्यांच्या खात्यात विमा भरपाईची रक्कम जमा झाली आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास हरियाणा सरकार शेतकऱ्यांना सातत्याने भरपाई देत आहे. रब्बी हंगाम 2022-23 मध्ये, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे बरेच नुकसान झाले. त्यासाठी ३१ कोटी रुपयांची नुकसानभरपाई दाव्याची रक्कम जारी करण्यात आल्याचे कृषीमंत्री दलाल यांनी म्हटले आहे.

'या' जिल्ह्याला सर्वाधिक भरपाई

पीकविम्यापोटी राज्य सरकारने शेतकरऱ्यांच्या खात्यात सुमारे ३१ कोटींची रक्कम जमा केली आहे. याचा सर्वाधिक लाभ सिरसा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झाला असून १६.४२ कोटींची रक्कम भरपाई म्हणून देण्यात आली आहे. तर रेवाडीतील शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईपोटी १०.३१ कोटी जमा करण्यात आली आहे. तसेच भिवानी आणि कुरूक्षेत्र जिल्ह्याला अनुक्रमे १.८९ कोटी आणि १.३६ कोटी रुपये भरपाई देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT