Ashok Chavan Agrowon
ॲग्रो विशेष

Ashok Chavan Latest News : अशोक चव्हाण यांच्याकडून नुकसानीची पाहणी

Crop Damage : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी (ता. २६) अर्धापूर तालुक्यात गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

Team Agrowon

Nanded Crop Damage News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी (ता. २६) अर्धापूर तालुक्यात गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या वेळी त्यांनी कामठा बुद्रुक, गणपूर, कोंढा, शेणी आदी गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

अर्धापूर तालुक्यातील बामणी, शेलगाव, दाभड, कामठा गणपूर सांगवी कोंढा देळूब, शेणी, पार्डी अर्धापूर आदी गावांत मंगळवारी दुपारी वादळी वारे गारपीट पाऊस गारपीट शेतीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे.

हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून नेला आहे. अशोक चव्हाण यांनी वेळ काढून गारपीट झालेल्या गावांना भेटी दिल्या. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने सरसकट मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

या वेळी बालाजी गव्हाणे, केशवराव इंगोले, पप्पू पाटील कोंढेकर, रणजितसिंग कामठेकर, शिवलिंग स्वामी, उमाजी भद्रे, शमीम अब्दुल्ला, महंतअप्पा बरगळ, नायब तहसीलदार मारोतराव जगताप उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Dealers Strike: कृषी निविष्ठा विक्रेते संपावर

Fertilizer Dealers Protest: विदर्भात कृषी विक्रेत्यांच्या संपाला शंभर टक्के प्रतिसाद

Tendu Leaf Collection: तेंदुपत्त्याच्या ३० हजार गोणींच्या संकलनाचे उद्दिष्ट

Summer Livestock Health Safety: उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क

Chana Procurement: मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रांवर ९५ हजार क्विंटल हरभरा खरेदी

SCROLL FOR NEXT